साळीस्ते गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने

ग्रामस्थानी घातला वैभववाडी येथील मुख्य अभियंताना घेरावा

लेखी आश्वासना नंतरच ग्रामस्थांनी घेतली माघार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथील गावात गेली २५ दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असून येथील वीज पुरवठा कायम खंडित होत असल्यामुळे गावातील ग्रामस्थ खुप त्रास्त झाले होते. वीज नसल्यामुळे गावातील सार्वजनिक नळयोजने कामकाज देखील बंद असल्याने पावसाळा असुन देखील चार ते पाच दिवसांनी नागरिकांना पाणी पुरवठा करावा लागत आहे. पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी एकत्र येत अखेर वैभववाडी येथील मुख्य विद्युत अभियंता कार्यालयाला घेराव घालत वीज समस्येचा जाब विचारला.

यावेळी साळीस्ते गावचे सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे,माजीउपसरपंच बाळासाहेब पाटील,अनंत बारस्कर, माजी उपसरपंच उदय बारस्कर मयुरेश लिंगायत, पोलिस पाटील गोपाळ चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश साळिस्तेकर, मा.प्रेमानंद कुलकर्णी, माजी सदस्य बबन कांजीर, समीर ताम्हणकर, रवी नारकर,नरेश ताम्हणकर, रवी गुरव, पप्या मेस्री, प्रदिप ताम्हणकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत अधिक वृत्त असे की, साळीस्ते गावात वारंवार लाईट जात असल्यामुळे नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत असे या पार्श्वभूमीवर वैभववाडी हेड डीव्हीजन चे मुख्य अभियंते मा.पाटील साहेब व तरेळे शाखेचे अभियंते मा.मांडवकर साहेब यांना सर्व ग्रामस्थांनी नुकताच घेरावा घालत भेट घेतली.व संपूर्ण साळीस्ते गावातील वीज समस्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण गावातील मेन लाईन व गावातील पोट लाईन यावरील वाढलेल्या झाडी मुळे नेहमी वीज पुरवठा खंडीत होत असतो त्यामुळे आठ दिवसात संपूर्ण गावातील लाईन वरील झाडी साफ करून द्या.तसेच लाईन दुरूस्तीचे काम तातडीने पुर्ण करा.अशी मागणी केली.

सेच याबाबत लेखी आश्वासन देखील आम्हाला द्या. असे ग्रामस्थानी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. दरम्यान संबंधित अधिकारी यांच्या कडुन लेखी स्वरुपात आश्वासन मिळाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी सबंधित कार्यालयाला आठ दिवसाची मुदत देण्याचे ठरविले. या आधी देखील गावातील वीज समस्येबाबत एक महिन्याची मुदत देवुन देखील वीज समस्येची कामे पूर्ण न झाल्यामुळे आता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत साळीस्ते गावातील वीज समस्या येत्या ८ दिवसात तातडीने सोडविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मंडळ यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!