शिडवणे शाळा नं.१ या शाळेच्या परिसरात वृक्षारोपण

प पू प्रभाकर नारकर प्रणीत औदुंबर सेवा ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) : प पू प्रभाकर नारकर प्रणीत औदुंबर सेवा ट्रस्ट ही नाधवडे यांच्यावतीने  शिडवणे शाळा नं.१ या शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निवृत पोलीस अधिकारी तसेच शिडवणे गावचे पुञ विजय टक्के यांनी सरपंच रविंद्र शेट्ये ,मनोहर कोकाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेद्र धुमाळ,उपाध्यक्ष समिता सुतार, सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, अन्वी येतकर, प्रेरणा कासार्डेकर, दिपाली शेट्ये, मिनाक्षी नारकर, पुजा इस्वलकर, सदाशिव कुडतरकर, श्रीराम पास्टे, तारीफ शेख, औदूबर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर,सचिव दिपक पावसकर,खजिनदार रूपेश कुडतरकर,नाधवडे  ग्रामविकास मंडळाचे खजिनदार रविंद्र खांडेकर, जिल्हा शांतता कमिटी सदस्य परशुराम इस्वलकर, रविंद्र गुंडये, ट्रस्टचे सदस्य प्रफुल घाडी, संतोष सावंत, योगेश शेट्ये, राजेंद्र नारकर, योगेश घाडी, आदी उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद सुजाता कुडतरकर, सिमा वरुणकर, हेमा वंजारी उपस्तिथ होते.

   यावेळी शिडवणे शाळा नं.१ येथे उच्चप्रतिचे नारळ नग ५,जांबळ नग २,रतांबे नग ३,फणस नग २,बाॅटल पाम नग ५ याप्रकारची एकुण १७ वृश लागवड करण्यात आली. नुसते वृक्ष न लावता त्यांचे व्यवस्थित संगोपण व्हावे यासाठी प्रत्तेक वृक्षा समोर संरक्षण जाळी हि लावण्यात येणार आहे.या वृक्षाची शाळेतील “एक वृक्ष एक विध्यार्थी” अशी संकल्पनां  राबवून विध्यार्थी त्या त्या वृक्षाचे संगोपण करणार आहे. औदुंबर सेवा ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी नाधवडे गावात शाळा,मंदिरे,सावजनिक स्मशानभुमी , ग्रामपंचायत परीसर ,सार्वजनिक ठिकाणे  परीसरात वृक्षारोपन केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!