अन्यथा युवासेना घालणार घेरावा
कणकवली (प्रतिनिधी) : सर्व सामान्य जनता आज जेव्हा रेशनधारक दुकानावर जेव्हा जाते तेव्हा त्यानां थम लावून ऑनलाईन प्रोसेस ने धान्य दिले जाते, पण आता नागरिक जेव्हा रेशन दुकानावर जातात तेव्हा सर्व्हर डाउनच्या अडथल्यामुळे नागरिकांना पाठी पाठवून देतात, सर्व सामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. एका व्यक्तीला 4 ते 5 वेळा थम लावण्यासाठी जावे लागत आहे तरी सुद्धा त्याला रेशन मिळत नाही आहे त्यामुळे त्यांना पाठी पाठवले जात आहे. नागरिकांना या येण्या जाण्याचा नाहक भुर्दंड पडत आहे, अश्या तक्रारी वारंवार मोठ्या प्रमाणात जनतेतून युवासेनेकडे येत असून यावर लवकरच उपाययोजना म्हणून जी ऑनलाईन प्रोसेस आहे ती ऑफलाईन पद्धतीने करावी यावर कलेक्टर व प्रांत अधिकारी यांनी लक्ष घालून तहसीलदारांना अश्या सूचना द्याव्यात की ऑनलाईन प्रोसेस ऑफलाईन करून नागरिकांच्या सह्या घेऊन त्यांना धान्य वितरित करावे. सर्व्हर चा जो प्रॉम्लेम आहे त्यावर ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन करून जास्तीत जास्त लवकर जनतेला दिलासा द्यावा व सुरळीत धान्य पुरवठा करावा.आता महिना अखेर असल्या कारणाने नागरिकांना याची मुदत वाढ ही द्यावी. नागरिकांना होणारा त्रास युवासेना सहन करणार नाही, जनतेला ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण न झाल्यास युवासेना तुमच्या ऑफिस ला घेरावा घातल्या शिवाय राहणार नाही असा इशारा युवासेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.