शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांचा पुढाकार
वैभववाडी (प्रतिनिधी) : समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ह्या कर्तृत्व भावनेतून खांबाळे गावचे सुपूत्र शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके हे गेली २५ वर्ष आपल्या गावच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्व:खर्चाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोके यांनी खांबाळे गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, छत्री इ. साहित्याचे वाटप केले. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवत्तापूर्ण शिक्षणात नेहमीच अव्वल राहीलेला आहे. त्याचे संपूर्ण श्रेय हे या जिल्ह्यातील शिक्षकांना दिले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने केंद्रशाळा खांबाळे नं.१ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, तंटामुक्त समिती सदस्य दीपक चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रियांका पवार, माजी सरपंच विठोबा सुतार, माजी उपसरपंच लहू साळुंखे, जेष्ठ ग्रामस्थ शांताराम कदम, बळिराम सावंत, दिनेश पालकर, सूर्यकांत सुतार, राजन साळुंखे, समीर जाधव, जयेश पवार, श्रीकृष्ण पवार, वृषाली पवार, श्रध्दा पवार व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.