शिडवणे गावातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी केला भाजप पक्षात प्रवेश

खारेपाटण (प्रतिनिधी) :: कणकवली तालुक्यातील शिडवणे गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकताच कणकवली तालुका भाजप अध्यक्ष दिलीप तळेकर व भाजप पदाधिकारी तथा माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे शिडवणे या गावातील कार्यकर्ते लक्ष्मण विष्णू जाधव, प्रकाश सखाराम करवंजे, चंद्रकांत परशुराम भोवड, गणू भिकाजी जाधव,राजन प्रभाकर पाष्टे यांनी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व राणे कडून विभगात व जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रवेशकर्त्या उबाठा शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजप पक्षात तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी स्वागत केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, बूथ अध्यक्ष महेंद्र टक्के, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल पांचाळ, यांसह दिनेश रांबाडे, शांताराम धुमाळ, सुप्रिया पांचाळ, महेंद्र धुमाळ, बाळकृष्ण सुतार, तारीफ शेख, प्रभाकर सुतार आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!