अशोक नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिर

45 रक्तदात्यांनी केले उत्स्फुर्त रक्तदान

कणकवली (प्रतिनिधी) : श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते तथा क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक ३० ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला तर ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ९ रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत.

या प्रसंगी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज पाटील, नायब तहसिलदारयादव, पाटील, डॉ.रासम, ऍड अभिजित सावंत, महानंदा चव्हाण, डोंगरे, हनमंते, तिवरेकर मॅडम, बुचडे भाऊ, भोसले मॅडम व तिप्पे मॅडम तसेच रुग्णालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी सुशिल परब, अशोक नारकर, दुर्गाप्रसाद काजरेकर, किरण सामंत, मकरंद सावंत, अमोल भोगले, अभिषेक नाडकर्णी, रुजाय फर्नांडिस आदींनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!