मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या १० जनपद वर

भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांची टीका

दिल्लीतून २८८ जागा स्वतंत्र लढण्याचा सल्ला तरी उद्धव ठाकरे आघाडीच्या दावणीला

आघाडीत उद्धव ठाकरेंना दमडीची किंमत राहिली नाही

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सरकारचे रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होते. आता मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत १० जनपद वर आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे त्यांना आदेश पाळावे लागतात. आणि त्यांचे आदेश येतील तसे मुंडके हलवतात अशी दयनीय परिस्थिती उबाठा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. दिल्लीतीतून एका नेत्याने महाविकास आघाडीत राहायचे नसेल तर २८८ जागा स्वतंत्र पने उबाठा पक्ष म्हणून लढवाव्यात असा सल्ला दिलेला आहे. तरी सुद्धा उद्धव ठाकरे या आघाडीच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे भांडुप मध्ये बसून संजय राऊतने कितीही डरकाळ्या फोडल्या तरी दिल्लीत त्याचा आवाज म्याऊ…म्याऊ…असाच येणार अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला ते म्हणाले, नागपूरमधील काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद काँग्रेसला घेण्यावर सर्व नेत्यांनी भर दिला आहे. मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे खेचून आणू असा इशारा दिलेला आहे. हे सर्व पाहता उद्धव ठाकरे आणि उबाठा पक्ष यांची महाविकास आघाडीत दमडीची किंमत राहिलेली नाही. तुमच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री म्हणून तुमचे किती बॅनर लावले, कालांतराने बायको, मुले, मिलिंद नार्वेकर यांचे सुद्धा बॅनर लावले तरी काँग्रेस आणि तुतारी वाले उद्धव ठाकरे यांची लायकी काढण्याचे थांबणार नाही. आणि मुख्यमंत्रीपद तर तुम्हाला कधी देणार नाही असा पुनरुचारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला. मातोश्री आणि उबाठा पक्ष ही पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे. त्यामुळे वरून सरदेसाई सर्च जागेवरून आमदारकी लढणार आहे. उद्या पाकिस्तान, बांगलादेश,अमेरिका मधूनही तो लढेल अशी उपरोधिक टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली. सकाळी ९० चा पेक मारून भोंगा सुरू होतो त्यामुळे काहीही बर्गळतो अशी टीका संजय राऊत यांचेवर आमदार नितेश राणे यांनी केली. महायुतीचे हिंदुत्ववादी चेच सरकार येणार आहे. मध्यप्रदेशात भाजप चे राज्य आहे. त्याठिकाणी टीका करता तसे हिंमत असेल तर पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदी चे सरकार आहे. तेथे कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे हल्ला करून लोकांचे प्राण दिवसा घेतले जात आहे. हिम्मत असेल तर ममता बॅनर्जींचा राजीनामा संजय राऊत यांनी मागावा असे आव्हान सुद्धा यावेळी केले. खोके आणि कंटेनर घेऊन आयुष्य घालवणार यांनी महायुती सरकारवर टीका करू नये. 2019 मध्ये उद्धव ठाकरे ला महाविकास आघाडीत घेऊन येण्यासाठी किती खोके संजय राऊतनी घेतले आणि किती कंटेनर घेतले त्या पैशातून कुठे जमिनी घेतल्या हे सर्व ज्ञात आहे. ठाकरे आणि राहूदे यांचा उदरनिर्वाह खोक्यांवर चालतो अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!