धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा

अन्यथा येत्या निवडणूकीत धनगर समाजाची ताकद दाखवू — आमदार गोपीचंद पडळकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा येत्या निवडणूकीत धनगर समाजाची ताकद दाखवून देऊ, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला. या आंदोलनात शेळ्या मेंढ्यासह  धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.

डोक्यावर पिवळी टोपी.. गळयात पिवळा स्कार्प आणि कपाळाला पिवळा भंडारा लावून आंदोलक या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. येळकोट येळकोट जय मल्हार.. अनुसुचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा. अशा  घोषणाबाजीनं  संपुर्ण परिसर दणाणून गेला होता. सुमारे दोन तासाहून अधिक वेळ हे आंदोलन करण्यात आलं . या रास्ता रोकोमुळे  वाहतूक, काही काळ विस्कळीत झाली होती.

यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी,धनगर समाजासाठी राज्य घटनेनं  दिलेल्या अनुसुचित जमाती आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा. अन्यथा येत्या निवडणूकीत धनगर समाज राजकारण्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा दिलाय.  राज्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात २५ हजारापासून एक लाख साठ हजारापेक्षा जास्त मतदार संख्या आहे. या समाजानं  एकजूट दाखवली तर, हे राज्यकर्ते गुडघे टेकतील. केवळ राज्यकर्त्यांच्या नाकरतेपणामुळेच गेल्या ७५ वर्षाहून अधिक काळ  या समाजावर अन्याय झालाय.  अनुसुचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यामुळेच धनगर समाज सामाजिक शैक्षणिक आणि  राजकीय दृष्ट्या मागास राहिला असल्याचं  त्यांनी सांगितलं.  

यावेळी नागेश पुजारी, डॉ संदीप हजारे, संजय पटकारे यांचीही भाषणं  झाली. या आंदोलनात रामचंद्र डांगे, बयाजी शेळके, कल्लाप्पा गावडे, संजय पटकारे, अशोक कोळेकर, राघु हजारे, मच्छद्रिं बनसोडे, राजेंद्र कोळेकर, राजेश तांबवे, मायाप्पा पुजारी यांच्यासह जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!