आचरा(प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली. चिंदरची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चिंदर भगवती माऊली मंदिर येथे सोसायटी चेअरमन सीताराम चंद्रकांत हडकर यांच्या अध्यक्षते खाली 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी विविध विषयावर चर्चा होत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी माजी चेअरमन धोंडी चिंदरकर यांनी सोसायटी उन्नतीसाठी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक संस्था सचिव कविंद्र माळगावकर यांनी तर समारोप चेअरमन सीताराम हडकर यांनी केला.
यावेळी व्हॉइस चेअरमन सुनिल पवार, संचालक- दिगंबर जाधव, रेशमा पाताडे, रविंद्र लब्दे, सतीश हडकर, सुरेश साटम, आनंद पवार, परेश चव्हाण, विश्वास खरात, विवेक परब, उपसरपंच दिपक सुर्वे, माजी चेअरमन धोंडी चिंदरकर, संतोष गांवकर, शशिकांत नाटेकर, अक्षय साटम, सतीश केरकर, विश्वास खरात, गुरू जावकर, सुनिल धुमडे, सदाशिव घागरे, जाधव, श्रीमती साटम, अजित सावंत, मोहन पाटणकर, भिकाजी घाडी, हळदणकर, बबन नार्वेकर, बाबली गांवकर आदी उपस्थित होते.