वेंगुर्लेतील प्रसाद करलकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आमरण उपाेषण

शासन विभागातील कामांमध्ये चुकीचे कामकाज

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध विभागामार्फत सुरु असलेले चुकीचे कामकाज आणि त्यातील त्रुटी दर्शवत त्यामध्ये तात्काळ सुधारणा व्हावी. या मागणीसाठी वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा येथील प्रसाद विजय करलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

वेंगुर्ले येथील प्रसाद करलकर यांनी जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानात उत्तम दर्जाच्या गोनी व गोनीत ५० किलोच्या गोणीत नेट धान्य असावे तसा लेबल असावा, गोणीला हुक लावू नये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशिय विद्युत खांब रस्त्याच्या अगदी लगत असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे खांब तातडिने बाजूला करावे, तसेच या खांबांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी विद्युत महामंडळाने स्विकारावी. विद्युत बीलावर मीटरचा फोटो असणे गरजेचे आहे कारण अंदाजे / सरासरी बील आकारणी पद्धत सर्वसामान्यांना त्रासदायक आहे याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. सर्व आरोग्य केंद्रात रुग्णवाहिनीवर ८ तासाच्या ३ सत्रात ३ वाहन चालक भरण्यात यावे. कोचरे गावातील उपकेंद्राची ड्रेनेज लाईन बंद असल्याने शासकिय अधिकारी व रुग्णांची अडचण होत असून यावर तोडगा काढण्यात यावा, कोचरे गावातील ग्राम महसुल अधिकारी शासन आदेशाचा अवमान करत आहेत याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. त्यांच्याकडून कामकाजाबाबत वेळोवेळी शासकिय वेळेचा भंग केला जातोय, याकडे लक्ष द्यावा, ओरोस- सिंधुदुर्गनगरी ही सिंधुदुर्ग जिल्हाची राजधानी असून देखील येथील रस्ते शासन आदेशानुसार नाहीत व हाच आदर्श सिंधुदुर्गवासिय घेत आहेत त्यामुळे येथील रस्ते सुनियोजीत रीत्या राजधानीला शोभेल असे असावेत.आदी विविध मागण्याकड़े लक्ष वेधन्यासाठी प्रसाद करलकर यांनी आजपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!