बाव येथील मयत हेमंत हडकर यांच्या कुटुंबियांना निलेश राणे यांच्याकडून अर्थसहाय्य

कुडाळ (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील बाव येथील हेमंत भिवा हडकर वय-३५ यांचे काही दिवसांपूर्वी आजाराने निधन झाले होते, त्यांच्या पच्छात दोन मुले व पत्नी असा परिवार असून घरातील कमवता पुरुष गेल्याने कुटूंबियांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. मयत हडकर यांचा एक मुलगा बाव प्राथमिक शाळा येथे इयत्ता पाचवी व एक पहिली इयत्तेत शिक्षण घेत आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी हडकर कुटुंबियांना आर्थिक मदत पाठवली.

आज ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, मंडल सरचिटणीस देवेंद्र सामंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्या तवटे, बाव माजी सरपंच नागेश परब, लक्ष्मण नेवाळकर, विजय गावकर, सुनिल वेंगुर्लेकर, निलेश परब, प्रमोद परब, आनंद परब, विराज बावकर, श्रावण सावंत वैभव परब, संतोष मेस्त्री, बाली नेवाळकर, सिद्धेश परब, दत्तात्रय परब, अभिजीत सावंत, प्रमोद कदम, आबा राऊत, प्रदीप तुळसकर, साईओम राऊत आदींनी बाव येथे जाऊन हडकर कुटुंबियांजवळ ही मदत सुपूर्द केली.

कुडाळचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे भजन स्पर्धा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आलं होत, या प्रसंगी भाजपा निलेश राणे यांनी कुडाळ येथे उपस्थित राहून श्री देव कुडाळेश्वराचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!