भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने मंडल निहाय बैठकांचे नियोजन

प्रत्येक मंडल निहाय प्रभारींची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हा कार्यकारणी बैठक ओरस “वसंत स्मृती” येथे संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या बैठकीत अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा संयोजक नामदेव जाधव यांनी गेल्या दोन महिन्यांत झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. तसेच काही मंडलामध्ये अजुन कार्यकारिणी झालेली नाही, त्यांनी आठवड्याभरात मंडलाची बैठक लावून कार्यकारिणी जाहीर करावी असे सांगीतले. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या बैठकीमध्ये कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वातून दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी कणकवली येथे “आरक्षण बचाव रॅली” काढण्यात आली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका भाषणामध्ये बोलले होते. की जर भारतामध्ये काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही आरक्षण रद्द करू असे विधान केले होते. त्यासंदर्भात कणकवली विधानसभेमध्ये आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली. त्यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले आरक्षण रद्द केले तर मी बहुजनांचा पाठीराखा म्हणून खंबीरपणे उभा राहीन असा यावेळी विश्वास दिला. त्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांचा आभाराचा व अभिनंदनचा ठराव जिल्हा संयोजक नामदेव जाधव यांनी मांडला.

यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक म्हणून श्री संतोष बाळकृष्ण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या बैठकीत मंडल निहाय बैठका निश्चित करण्यात आल्या व त्या त्या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा कोषाध्यक्ष अनंत आसोलकर, जि.उपाध्यक्ष अशोक दत्ताराम कांबळे, जि.चिटणीस राजेंद्र शांताराम चव्हाण, जि.संघटक राजेश सुरेश चव्हाण, जि.संघटक पुंडलिक तुकाराम कदम , जि.संघटक महेश गणपत चव्हाण, जि.संघटक विद्याधर गोविंद कदम, वेंगुर्ले अध्यक्ष बाळा मधुकर जाधव, कुडाळ अध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मण वालावलकर, देवगड अध्यक्ष देवदत्त दामोदर कदम, सोशल मिडीयाचे किरण जाधव, पुंडलिक कदम, राजेश सुरेश चव्हाण, विद्याधर कदम, संतोष बाळकृष्ण जाधव, नगरसेविका गौतमी कदम इत्यादी उपस्थित होते .
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत वालावलकर यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष जाधव यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!