कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या मैदानी क्रीडा स्पर्धेत कु. नम्रता गावकर हीला हॅपथ्याथलॉन या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर कु. सुजाता हरणे हिला कांस्यपदक. मुंबई विद्यापीठाच्या वरील लाईनच्या क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाची कु. नम्रता गावकर हिने हॅपथ्याथलॉन या क्रीडा प्रकारात मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तर कु. सुजाता हरणे हिने कास्यपदक मिळवले आहे. तत्पूर्वी कोकण झोन-०४ च्या स्पर्धेत याच क्रीडा प्रकारात कु. नम्रता हिने प्रथम क्रमांक मिळवला होता आणि कु. सुजाता हरणे हिने तृतीय क्रमांक मिळवला होता. दोघांनीही मुंबई विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत आपले नंबर कायम ठेवण्याचा मान मिळवला आहे. कोकण झोन- ०४ च्या मैदानी क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे कु. सानिया खरात हिने पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. निशांत परब याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. शुभम चव्हाण याणे लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. कु. निकिता लाड हिने ३००० मीटर स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या कोकण झोन-०४ च्या आणि संपूर्ण मुंबई विद्यापीठाच्या मैदानी क्रीडा स्पर्धेत कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व स्पर्धकांना क्रीडा प्रशिक्षक मंदार परब, जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. राजेंद्र मुंबरकर, जिमखाना विभागाच्या सचिव प्रा. अदिती मालपेकर, संघनायक प्रा. सचिन दर्पे, प्रा. पल्लवी चिंदरकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. या सर्व यशस्वी क्रीडापटूंचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, अध्यक्ष दत्तात्रेय तवटे, सचिव विजयकुमार वळंजू, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे व जिमखाना विभाग प्रमुख डॉ. राजेंद्रमुंबर कर यांनी विशेष अभिनंदन केले आहे. कणकवली महाविद्यालयाच्या गुणी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.