वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वसुबारसचे औचित्य साधून २८ ऑक्टोबर रोजी शेतक-यांच्या निवासस्थानी गोमातेचे पूजन करण्यात आले. ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने वसुबारस हा सण उत्साहात साजरा करावा असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी गोपालक शेतकऱ्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातही ठिक ठिकाणी गोमाता पूजन कार्यक्रम करण्यात आले.
वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका, होळकर मंदिर शेजारील ऍड. प्रकाश बोवलेकर, भटवाडी येथील कल्याण सावंत, अनिल आठलेकर, आडी स्टॉप नजिकचे मेघा पाटकर यांच्या निवासस्थानी असलेल्या गाईचे पूजन करताना त्यांना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, विश्व हिंदु परिषदेचे डॉ.राजन शिरसाठ, रविद्र शिरसाठ आदी उपस्थित होते.
दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुहासिनी वैद्य, परूळेबाजार येथील रा.स्व.संघाचे कार्यकर्ते शेखर जोशी, दाभोली येथील भाजपाचे बुथ प्रमुख अनिकेत कांबळी व गुरूनाथ कांबळी, मोचेमाड येथील किसान मोर्चाचे सत्यवान पालव, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, मठ कणकेवाडी येथील राणे यांच्याकडे, उभादांडा आडारी येथील हेमंत खराडे, तुळस येथील महेश राऊळ व गुरूदास तिरोडकर, मठ येथील रा. स्वयं. संघाचे ओंकार मराठे, म्हापण बुथ प्रमुख प्रदिप गवंडे, भाजपा ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, तुळस मधील किसान मोर्चाचे विजय रेडकर, परबवाडा – कणकेवाडी येथील जीवन परब यांनी आपल्या घरी गोमातेचे पूजन करून वसुबारस साजरी केली.