आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कलमठ जलजीवन नळ याेजनेचे भुमिपूजन

जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ३१ लाख नळयोजना तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून ७ लाख मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळयोजना १ कोटी ३१ लाख तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून ७ लाख मंजूर असलेल्या कलमठ वरची कुंभारवाड़ी रस्त्याचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सोबत उपस्थित भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, विजय चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, दिनेश गोठणकर, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, हेलन कांबळे, आबा कोरगावकर, मिलिंद चिंदरकर, समिर कवठणकर, स्वरूप कोरगावकर, समर्थ कोरगावकर , निशा नांदगांवकर, दत्ता वावळीये, संदिप चिंदरकर, तेजस लोकरे, बाबू नारकर, गुरू वर्देकर, अमजद शेख, जितू कांबळे, गणेश गोठणकर, शानू शाह, प्रशांत गोठणकर, तुषार चिंदरकर, प्रविण सावंत, बाबू चिंदरकर, सत्येंद्र जाधव, प्रदीप धवण, पंकज चिंदरकर, मिथिलेश गोठनकर, रोहित चिंदरकर तसेच भाजप पदाधिकारी व कलमठ ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले. कलमठ गावातील कलेश्वर मंदिर गार्डन लवकरात लवकर प्रशासकीय बाबी पूर्ण करू, असे यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!