देवगड (प्रतिनिधी) : इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ॲम्बेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्राध्या. हरिभाऊ भिसे यांची निवड करण्यात आली आहे .कणकवली येथे पार पडलेल्या बैठकीत या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला देवगड, कणकवली ,मालवण, सावंतवाडी ,दोडामार्ग या भागातील प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.प्रास्ताविक करताना प्रा. हरिभाऊ भिसे यांनी उपस्थित यांचे स्वागत केले या बैठकीच्या कार्याविषयी व बैठकीतील ध्येय धोरणे समाज उपयोगी विविध उपक्रम याविषयी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय कदम ,दयानंद मांगले ,देवगड तालुका अध्यक्ष श्याम कदम यांनी विचार मांडले. अनुषंगाने बुलंद पटेल,सूर्यकांत शृंगारे प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांनी चर्चेत सहभाग घेऊन महत्वपूर्ण सूचना व पुढील योग्य ती कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीच्या निमित्ताने जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ भिसे यांनी मार्गदर्शन करून संघटनेचे पुढील कार्य याविषयी रूपरेषा याबाबत उहापोह केला.व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची घोषणा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ भिसे यांनी केली
यात कार्याध्यक्षपदी सुनील मेस्त्री उपाध्यक्ष दयानंद तेली, बुलंद पटेल ,प्राचार्य डॉ. सुभाष सावंत सूर्यकांत शृंगारे, प्रभारी जिल्हा सरचिटणीस सौ.शरयु ठुकरुल पोलीस संरक्षण विभाग जिल्हाप्रमुख विजय कदम, मीडिया जिल्हाध्यक्ष दयानंद मांगले,सदस्य राजन भोसले ,प्राध्या.महादेव माने, आनंद देवगडकर,रंजन चव्हाण ,महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुरेखा भिसे ,जिल्हा महिला कार्याध्यक्ष श्रीमती मेस्त्री, जिल्हा महिला सरचिटणीस सौ.दीक्षा तेली सदस्य सौ रीमा भोसले सौ ,स्नेहल मेस्त्री,सौ. युगंधरा सावंत, याची निवड करण्यात आली.