देवगड (प्रतिनिधी) : शिक्षक विद्यार्थी घडवितो तर पत्रकार समाज घडवितो हे पुन्हा एकदा देवगड तालुका पत्रकार समितीचे सदस्य राजीव पडवळ यांनी दाखवून दिले.ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज होती. मात्र जिल्हा रक्तपेढी येथे जाऊन देखील काही तांत्रिक कारणास्तव रक्तदान करता आले नाही.पण निश्चय केला तर तो सार्थकी लावायचा या जिद्दीने पेटलेल्या पत्रकार राजीव पडवळ यांनी आज शनिवारी देवगड ते पडवे असा प्रवास करत sspm लाईफ टाईम हॉस्पिटल रक्तपेढी येथे जात आपला रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला.
दिनांक ०७ डिसेंबर २०२४ रोजी मनिषा मंगेश शेटये (करूळ, कणकवली) या पेशंटला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचारासाठी दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची गरज होती. यावेळी या केससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि नियमित रक्तदाते पत्रकार श्री राजीव पडवळ (देवगड) यांनी SSPM लाईफटाईम हॉस्पिटल रक्तपेढी, पडवे येथे जाऊन दुर्मिळ रक्तगटाचे अमूल्य असे रक्तदान केले.आतापर्यंत पत्रकार पडवळ यांनी ७ वेळा रक्तदान केले आहे. यापूर्वी ही त्यांनी तात्काळ रक्तदान केले आहे.
याच केससाठी श्री राजीव पडवळ (देवगड) हे काल रक्तदान करण्यासाठी जिल्हा रक्तपेढी, सिंधुदुर्ग येथे गेले होते मात्र तांत्रिक कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नव्हते. मात्र त्यांनी पुन्हा आज रक्तदान करण्यासाठी देवगड ते SSPM पडवे एवढा मोठा प्रवास करत जी तत्परता दाखवली त्यांच्या या जिद्दीला सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान , तसेच देवगड पत्रकार मित्र, फ्रेन्ड सर्कल यांनी अभिनंदन केले आहे.