दाभोळे तिठा पिकअपशेड येथून मोटरसायकल चोरीस

देवगड (प्रतिनिधी) : खाजगी टड्ढव्हलर्सवर चालक असलेल्या टेंबवली कोयंडेवाडी येथील उमेश सत्यवान कोयंडे यांनी मुंबईला जाताना दाभोळे तिठा पिकअपशेडसमोर लॉक करून ठेवलेली मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली.या चोरीप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, टेंबवली कोयंडेवाडी येथील उमेश सत्यवान कोयंडे हे दिक्षीत या खाजगी टड्ढॅव्हलर्सवर चालक आहेत.ते २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वा.दिक्षीता टड्ढॅव्हलर्स ही गाडी मुंबईला घेवून जाण्यासाठी निघाले यावेळी गावाहून स्वत:चा मालकीची हिरोहोंडी कंपनीची सीबीझेड एक्सप्रेम नं.एम्.एच्.०७-व्ही २१८८ ही मोटरसायकल त्यांनी दाभोळे पिकअपशेड समोर बंद हॉटेलच्या समोर लॉक करून उभी करून ठेवली व ते टड्ढॅव्हलर्स घेवून मुंबईला गेले.२८ रोजी ते मुंबईहून सकाळी ७.३० वा.सुमारास आल्यानंतर त्यांनी ज्या जागी मोटरसायकल ठेवली होती ती चोरून नेल्याचे निदर्शनास आले.त्यांनी या चोरीबाबत देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!