राज्यातील बांधण्यात येणारे बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावेत

बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

पुढील 100 दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत करावीत यासाठी अधिकार्यांनी दक्ष रहावे, गुणवत्तेत तडजोड खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या इमारतीत बंदरे विकास विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, महाराष्ट्र सागरी मंडळ ही महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लहान बंदराच्या विकासासाठीची शिखर संस्था आहे.राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून हया बंदरांचा विकास होणे अपेक्षित आहे.बंदरांचा विकास करतांना पारदर्शकता असावी.महाराष्ट्र राज्यातील लघु आणि मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिनाभरात काही बंदरांचा उद्घाटन तर काही भुमीपुजन करण्यात येणार आहे. सर्व कामे पुर्ण असेल तरच उद्घाटन करावे.काही त्रुटी असतील तर तातडीने पूर्ण करावे. विविध उपक्रम राबविसाठी धोरण ठरवा. रेडिओ क्लब काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा असेही मंत्री राणे म्हणाले.

पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर आढावा घेतला.यावेळी वाढवण बंदराचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी बंदरे विकास विभागाचे मा.अपर मुख्य सचिव(संजय सेठी ), मु.का.अ. (माणिक गुरसाळ) वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी(प्रदिप बढीये), मुख्य अभियंता (राजाराम गोसावी) वित्तीय नियंत्रक नि. मुख्य लेखाधिकारी (सुरेश सारंगकर) यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाचे अतुल पाटणे भा.प्र.से.,व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळ पंकज कुमार उपस्थित होते.तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट चे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!