फोंडाघाट मधील 21 वर्षीय युवती बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : साक्षी अविनाश घोडके ( वय 21, रा. विद्यानगर, फोंडाघाट ) ही युवती 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद तिचे वडील अविनाश शंकर घोडके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. साक्षी ही पणदूर येथील कॉलेजमध्ये शिकत आहे. 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता ती फोंडाघाट येथील राहत्या घरातून बाहेर पडली. घरातून निघताना सॅक मध्ये कपडे भरून घेऊन गेली असून तिचा रंग गोरा आहे.उंची 5 फूट असून हनुवटीवर काळा तीळ आहे.

error: Content is protected !!