जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध असोसिएशनचा १७ एप्रिलपासून संयुक्त उपक्रम
तळेरे (प्रतिनिधी) : खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता (Physical Fitness) खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्यार्थ्यांचे आयोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत, मल्लखांब, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग, कॅरम, बुद्धिबळ, रायफल शूटिंग यांसारख्या अनेक खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आले आहे.
री सर्व खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांना जिल्हावासियांना केले आहे.
खेळाचे नाव, शिबीराचे ठिकाण, दिनांक, वेळ व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
- मल्लखांब जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण दि. 17 ते 27 एप्रिल 2023 सकाळी 8 ते 10 व
सायं. 5 ते 7 शांताराम जोशी 9421230886 - बास्केटबॉल जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण दि. 17 ते 27 एप्रिल 2023 सकाळी 8 ते 10 व
सायं. 5 ते 7 अजय शिंदे 9422394186 - बॉक्सिंग जिल्हा क्रीडा संकुल ओरोस दि. 17 ते 27 एप्रिल 2023 सकाळी 08 ते 10 एकनाथ चव्हाण 8108753626
- कबड्डी जिमखाना स्टेडीयम नगरपरिषद , सावंतवाडी दि. 17 ते 27 एप्रिल 2023 दुपारी 03 ते सायं. 06 ॲलिस्का अलमेडा 7447518788
- वेटलिफ्टींग वराडकर हायस्कुल कट्टा, ता.मालवण दि. 17 ते 27 एप्रिल 2023 सकाळी 08 ते 10 संजय पेंडूरकर 9422392790
- पॉवर लिफ्टींग जिल्हा क्रीडा संकुल ओरोस दि. 17 ते 27 एप्रिल 2023 सायं.04 ते 07 विजय शिंदे 8208882591
- कॅरम पंचम खेमराज विद्यालय सावंतवाडी दि. 17 ते 27 एप्रिल 2023 सकाळी 08 ते 10 योगेश फणसळकर 7620755766
- बुद्धीबळ ऑनलाईन दि. 17 ते 27 एप्रिल 2023 सायं.07 ते 09 श्रीकृष्ण आडेलकर 9422381949
- रायफलशुटींग सावंतवाडी उपरकर शुटींगरेंज दि. 17 ते 21 एप्रिल 2023 सकाळी 08 ते 10
श्री कांचन उपरकर 9527417680 - शुटींगरेंज वेंगुर्ला दि. 22 ते 27 एप्रिल 2023 सायं. 04 ते 06
- प्रशिक्षण शिबीराचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळप्रेमी विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तसेच संबंधित असोसिएशन आणि प्रशिक्षकांच्यावतीने करण्यात आले आहे.