साळेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरास प्रतिसाद

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

चौके (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त साळेल येथे दिनांक २३मार्च रोजी नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उपस्थितीत पार पडला
यावेळी साळेल सरपंच रविन्द्र साळकर उपसरपंच नाना परब ग्रामपंचायत सदस्य संपदा गावडे,सिद्धी पवार,अश्विनी जाधव, समीर गावडे विवेकानंद पेडणेकर महिला शाखा संघटक पुजा साळकर शिवसेना पेंडूर विभाग प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे ग्रामस्थ महेश गावडे,सुनिता नलावडे,सुभाष गावडे,शिवराम गावडे शाखा प्रमुख समीर गावडे,रामचंद्र गावडे वगैरे ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हा रुग्णालय ओरोसच्या नेत्र चिकित्सक डॉ भाग्यश्री धायतिडक यांनी नेत्र तपासणी केली या नेत्र तपासणी शिबिराचा ४७ ग्रामस्थांनी लाभ घेतला ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!