ओरोस प्राथमिक शाळेला संगणक संच प्रदान

खासदार निधीतून शाळेला विंधन विहीर, पाण्याची टाकी देणार

खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नं. १ या शाळेला मिळालेले संगणक हाताळ ल्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. असे सांगतानाच या शाळेला आवश्यक असलेली विंधन विहीर आणि पाण्याची टाकी आपल्या खासदार निधीतून लवकरच मंजूर करून देणार असल्याची ग्वाही आज खासदार विनायक राऊत यांनी येथील संगणक संच वितरण सोहळ्यात बोलताना दिली.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदार निधीतून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नं. १ या शाळेला संगणक संच मंजूर झाला होता. हा संच उपलब्ध झाल्यावर आज संगणक संचाचा वितरण सोहळा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार वैभव नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश ओरोसकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे, अमित भोगले,महेश पारकर, मुख्याध्यापिका स्मृती मुंडले, सुनील जाधव, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका स्मृती मुंडले म्हणाल्या की, खा. राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या शाळेला संगणक मिळाले आहेत. त्याचा आम्ही पुरेपूर वापर करू. संगणक वापर ही काळाची गरज बनली आहे. पिंगुळी येथील संस्थे मार्फत सध्या मुलांना संगणक प्रशिक्षण दिले जात आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी आपण खासदारांकडे संगणकाची मागणी केली होती आणि त्यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली होती. ती आज पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदार निधीतून हा संगणक संच देण्यात आला आहे. जास्त पटसंख्या असणारी ही शाळा आहे. त्यामुळे या संगणक संचाचा जास्तीत जास्त वापर करून ज्ञानी मुले घडवा आणि संगणक शिक्षणाच्या वापर करून या शाळेची पटसंख्या आणखी वाढवा असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच या शाळेची मागणी असलेले टाकी सहित विंधन विहीर आपण खासदार निधीतून मंजूर करू असे आश्वासन देत या शाळेला आवश्यक असलेलं सहकार्य करू करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!