सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ८ शिक्षकांची ५ सप्टेंबर २०२२ रोजी (शिक्षक दिनी) पुरस्कारासाठी निवड केली होती. या निवड झालेल्या शिक्षकांना सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये श्रीमती आदिती अविनाश राणे पदवीधर शिक्षक (देवगड), डॉ उत्तम तुकाराम तानावडे उपशिक्षक (दोडामार्ग,) श्री सत्यवान शांताराम चव्हाण पदवीधर शिक्षक (कणकवली), श्री विजय बबन धामापूरकर पदवीधर शिक्षक (कुडाळ ), श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर उपशिक्षक (मालवण) , श्री केशव बाबी जाधव पदवीधर शिक्षक (सावंतवाडी), श्रीमती राजश्री नामदेव शेटे पदवीधर शिक्षक (वैभववाडी), श्री विनोद राजाराम मेथर, उपशिक्षक (वेंगुर्ले), आदी शिक्षकांना या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.












