कणकवली (प्रतिनिधी) : रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कळसुली शिक्षण संघ, मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन कणकवली तहसीलदार आर.जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मंडळ अधिकारी दिलीप पाटील, सहाय्यक संचालक नगर विकास विद्याधर तुकाराम देसाई,पी.एस.आय.बापू खरात, माजी जिल्हाध्यक्ष आर.बी.दळवी, माजी उपसभापती सुचिता शामसुंदर दळवी, माजी अध्यक्ष (प्राथमिक शिक्षक संघ) प्रकाश कृष्णा दळवी, संस्था अध्यक्ष-पुरुषोत्तम दळवी,कळसुली सरपंच सचिन पुनाजी पारधीये,संस्था कार्याध्यक्ष सूर्यकांत राजाराम दळवी, संस्था खजिनदार जय मारुती दळवी,उपकार्याध्यक्ष प्रभाकर नारायण दळवी,चंद्रशेखर महादेव दळवी,संस्था सल्लागार मोहन परब,एम.डी.नाईक,राजहंस दळवी, स्कूल कमिटी चेअरमन के.आर.दळवी,व्हा.चेअरमन नामदेव घाडीगांवकर, सदस्य रजनीकांत सावंत,कळसुली उपसरपंच गजानन दाजी मठकर,ग्राम विस्तारअधिकारी तेंडुलकर,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सावंत,प्रशाला मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, देणगीदार, हितचिंतक, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
गणेशपूजन आणि भूमिपूजन सर्व धार्मिक विधी कळसुली शिक्षण संघ मुंबईचे सेक्रेटरी विजय सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यानंतर उपस्थित मान्यवरांचं यथोचित स्वागत संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पवार साहेबांनी संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा देत संस्था पदाधिकाऱ्यांच्या उत्साहपूर्ण कार्याचे विशेष कौतुक केले आणि नूतन इमारतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूल कमिटी चेअरमन के आर. दळवी यांनी केले. यामध्ये त्यांनी प्रशाला इमारतीच्या बांधकामाचा पूर्व इतिहास थोडक्यात विषद करत आजचा भूमिपूजन कार्यक्रम हा सर्वांच्या इच्छांचे मूर्त स्वरूप असून त्यामागे माजी संस्था अध्यक्ष तसेच संस्था पदाधिकारी यांची अपार मेहनत असल्याचे स्पष्ट केले व त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. संस्था सेक्रेटरी विजय सावंत यांनी नूतन इमारत बांधकामासाठी लाभलेल्या सर्व देणगीदारांचे ऋण व्यक्त करत इतरांनाही सढळ हस्ते मदतीचे आवाहन केले.आर. बी दळवी,प्रकाश दळवी तसेच दिलीप पाटील आदी मान्यवरांनी संस्थेच्या या नवीन उपक्रमाला आपल्या मनोगतातून भरभरून शुभेच्छा दिल्यात. आपल्या अध्यक्षीय भाषणात कळसुली शिक्षण संघ मुंबईचेअध्यक्ष पुरुषोत्तम दळवी यांनी नूतन इमारतीचे स्वप्न पूर्ण होत असताना या इमारतीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व हातांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत सर्व हितचिंतक, देणगीदार यांचे आभार मानून याप्रमाणे असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जी.सावंत यांनी केले.