सरपंचांच्या प्रयत्नांना यश : ग्रामस्थांनी केले समाधान व्यक्त
चौके ( प्रतिनिधी) : चौके ते कुडाळ रस्त्यावरील चौके समाज मंदिर ते देवलीला जाणाऱ्या रस्त्यावर गटार खोदाई न केल्यामुळे पावसाळ्यापूर्वी अवकाळी पडलेल्या पावसामुळे पाणी तुंबून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहन चालक आणि पादचारी यांना त्रास सहन करावा लागत होता ही बाब चौके सरपंच पी. के. चौकेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्या नतंर सार्वजनिक बाधकांम विभागाने यांची त्वरित दखल घेउन जे.सी.बी.च्या सहाय्याने गटार खोदाई करण्याचे काम बुधवार रोजी करण्यास सुरूवात करुन गटार खोदाई केली. याबाबत पी.के.चौकेकर यांना धन्यवाद देऊन ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तसेच चौके सरपंच यानी दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांच्याकडे रस्त्यावरील मोऱ्यांची सफाई करावी तसेच झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत त्या तोडून घेण्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले आहे त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता श्रीमंत लोखंडे यांनी पहाणी करून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र मे महिना संपत आला तरी पावसाळ्यापूर्वी ची कामे केली नाहीत आणि अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने गटारे तुंबून वाहन चालकांना आणि पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच मालवण कसाल रस्तावरील चौके नाका ते दीपक चौकेकर यांच्या घरापर्यंत गटार खोदाई न केल्यामुळे दीपक चौकेकर यांच्या घरात गटाराचे पाणी शिरले होते.दोन महिन्यापुर्वी तक्रार देऊनही व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने प्रत्यक्षात पाहणी करूनही यांची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही या बाबत चौके ग्रामस्थानमधून संताप व्यक्त केला जात आहे. याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सरपंच पी. के. चौकेकर यांनी केली आहे.












