अन् रविवारीही वाजली शाळेची घंटा !

राष्ट्रगीत, प्रार्थना आणि दिपप्रज्वलन करून काळसे हायस्कूल आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास प्रारंभ

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदीर काळसे माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त आज काळसे हायस्कूल येथे आज ३० एप्रिल रोजी आयोजित आजी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचा शुभारंभ सकाळी माई कांडरकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. तत्पूर्वी माजी विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून शाळेची घंटा वाजवून शाळा भरवण्यात आली. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायन आणि प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सभागृहात सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दिपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी श्रीमती माई कांडरकर, यांच्यासह माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे संस्थापक चंद्रकांत दळवी, अध्यक्ष विनोद गोसावी, कार्याध्यक्ष हरेश काळसेकर, उपाध्यक्ष प्रकाश प्रभु, शशिकांत गावडे, सचिव संतोष गुराम, खजिनदार दत्ताराम नांदोस्कर, मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, माजी सरपंच केशव सावंत, शरद गोसावी, राजन प्रभु, अनंत परब, गोरखनाथ गोसावी, राजेंद्र मालंडकर, दाजी परब, चंद्रकांत तळवडेकर, सतिश राणे, अरविंद नातू, दाजी परब, मधुकर घाडी, पंढरी प्रभु, संदिप माडये, सिताराम परब, प्रकाश गोसावी, रमेश दळवी, केशव दळवी, सुनिल म्हापणकर, राजेंद्र परब, अण्णा गुराम, संजय गोसावी, दिनेश काळसेकर तसेच इतर आजीमाजी विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!