दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान गेली 8 वर्षे श्रमदान मोहिमा राबवून विविध पारंपारिक सण-उत्सव आयोजित करुन रामगड जागता ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यंदा 1 मे रोजी सकाळी 9 वा. रामगड बाजार पेठ ते रामगड किल्ला पालखी मिरवणूक, सकाळी 10.30 वा. गडपूजन, गणेश पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन, संध्याकाळी 6 वा. शिवकाळाची अनुभूती करून देणारा दीपोत्सव आणि मशालोत्सव होणार आहे. तरी शिवप्रेमी, शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र व रामगड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.