डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त दोडामार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने वत्कृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन

दोडामार्ग (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्गच्या वतीने खुली मोठया व लहान गटात वत्कृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यात महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. जयंती उत्सवाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्गच्या वतीने खुली मोठया व लहान गटात वत्कृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धाकांनी दिनांक १० एप्रिल २०२६ पर्यंत तर निबंध स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धाकांनी दिनांक १० एप्रिल २०२६ पर्यंत आपले निबंध पाठवीण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे. दिलेल्या तारखे नंतर नावं नोंदणी केली जाणार नाही असे आयोजकांनी सांगितले आहे.

वत्कृत्व स्पर्धा :
विषय – १) “प्रगत भारताचा पाया : महामानवाचा विचार”, २) “त्यागाची उत्तुंग माऊली : वंदनीय माता रमाई”, ३)”शाळेबाहेरील बाक ते संविधानाचा मसुदा : एक प्रेरणादायी प्रवास” (लहान गट इ. ०५ वी ते १० वी वेळ मर्यादा ७ मिनिट)

विषय – १) “माणुसकीचा हुंकार : डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीची यशोगाथा”, २) “भारतीय संविधान : लोकशाहीचा प्राण आणि राष्ट्रवादाचा आधार”, ३) “बुद्ध आणि त्यांचा धम्म : वैश्विक शांततेचा एकमेव मार्ग” (मोठा गट इ. ११ वी ते १५ वी वेळ मर्यादा १० मिनिट)

निबंध स्पर्धा :
विषय – १) “मानवतेचे पुजारीः बहुजन प्रतिपालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, २) “भीमरावांच्या यशाचा भक्कम पायाः आदर्श पिता रामजी सकपाळ”, ३) “ज्ञानाचे प्रतीकः डॉ. बाबासाहेबांचा प्रगत शैक्षणिक दृष्टिकोन” (लहान गट इ. ०५ वी ते १० वी शब्द मर्यादा ४०० ते ५०० शब्द)

विषय – १) “स्त्री मुक्तीची सनद : हिंदू कोड बिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, २) “विकास नीतीचे शिल्पकार : डॉ. आंबेडकरांचे जल, विद्युत आणि कामगार धोरण”, ३)”संविधानिक मूल्ये आणि आजचा भारत : एक चिंतन” (मोठा गट इ. ११ वी ते १५ वी शब्द मर्यादा ७०० ते ८०० शब्द)

वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेसाठी पारितोषिके पुढील प्रमाणे :-
लहान गट : प्रथम पारितोषिक – १००० रुपये, सहभाग प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह, द्वितीय पारितोषिक – ७०० रुपये, सहभाग प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह, तृतीय पारितोषिक – ५०० रुपये, सहभाग प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह

मोठा गट : प्रथम पारितोषिक – १५०० रुपये, सहभाग प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह, द्वितीय पारितोषिक – १००० रुपये, सहभाग प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह, तृतीय पारितोषिक – ७०० रुपये, सहभाग प्रमाण पत्र व स्मृती चिन्ह

तसेच दोन्ही स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून गुणगौरव केला जाईल.

अधिक माहिती नावं नोंदणी आणि निबंध पाठविण्यासाठी संपर्क :- बुध्दभूषण हेवाळकर 9112671161, रमाकांत जाधव 9423806365, शंकर जाधव 9763379306, अंकुश जाधव 94228 96644, विजय जाधव 7066800650 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्ग यांनी केले आहे.

error: Content is protected !!