खारेपाटण संभाजी नगर ब्राम्हण देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५/१५ फंडातून खारेपाटण संभाजीनगर वरची गुरव वाडी येथील ब्राम्हण देवस्थानकडे शरद गुरव घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, जयदीप देसाई, मनाली होणाळे, क्षितिजा धुमाळे, सुहास राऊत, सागर पोमेडकर, प्रणय गुरसाळे, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सध्या खारेपाटण मध्ये विविध रस्त्याचे कामाच्या शुभारंभ ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या प्रयत्नातून होत असून खारेपाटण संभाजी नगर ब्राम्हण देवस्थानाकडे शरद गुरव यांच्या घराकडे जाणाऱ्या या रस्त्यासाठी सुमारे ५ लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने खारेपाटण ग्रामपंचायत व नामदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!