बुद्ध पौर्णिमेनिमित्त खांबाळे येथे संयुक्त जयंती महोत्सव साजरा

बुद्धाचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अभ्यास करणे गरजेचे – प्रा.प्रमोद जमदाडे

वैभववाडी (प्रतिनिधी): तथागत भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षापूर्वी हिंसा न करता जगाला बौध्द धम्माच्या तत्वाने प्रेमाने जिंकता येते असा शांतीचा संदेश दिला तोच संदेश अंमल करून सम्राट अशोकाने अहिंसेचे पालन करून लोकसत्ताक असे लोकांचे राज्य निर्माण करून बौद्ध धम्माचा जगात प्रचार आणि प्रसार केला. हीच खरी जबाबदारी प्रत्येक बौद्ध अनुयायाची आहे. असे प्रतिपादन प्रा.प्रमोद जमदाडे सर यांनी खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई/ग्रामीण आयोजित बुद्ध पौर्णिमे निमित्त राष्ट्रपुरूषांच्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम प्रसंगी खांबाळे बौद्धवाडी येथे केले. या प्रसंगी ते पुढे म्हणाले की, बुद्धाचे तत्वज्ञान प्रगल्भपणे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. देशाच्या व्यापारावर बौद्धांचे नियंत्रण हवे. पंचशीलाचे पालन करणारा तो खरा बौद्ध होय. म्हणूनच आपण आता शिकून संघटित होऊन धर्मांतराच्या साठ वर्षा नंतर आपण बौद्ध धम्माचा किती अंगीकार केला काय मिळाले, कोणते रीतीरीवाज सोडले. बौद्ध तत्वज्ञानाचा प्रत्येक्ष व्यवहारात कसा अंमल केला. याचे आपण सिंहावलोकन करणे गरजेचे झालेले आहे तरच बौद्ध धम्माचा घरा-घरात प्रचार आणि प्रसार होईल. भारत देशात पूर्वी संख्येने 90 टक्के असणारा बौद्ध धम्म आता 10 टक्केच राहीलेला आहे. तो नव्वद टक्के होण्यासाठी आपण सर्वांनी जागृत राहून प्रयत्नशील राहिले पाहिजे. यावेळी विचारमंचावर खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, खांबाळे बौद्ध विकास मंडळ मुंबई अध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण सरचिटणीस रविंद्र पवार, ग्रामीण अध्यक्ष अमृत कांबळे, सुप्रसिध्द भजनी बुवा संजय पवार, पत्रकार मारुती कांबळे, प्रा.गुलदे सर, माजी सरपंच विठोबा सुतार,भगवान कांबळे, प्रफुल्ल जाधव, गुरुनाथ गुरव, गणेश सदाशिव पवार उपस्थित होते. सरपंच गौरी पवार म्हणाल्या की, शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. यावेळी रविंद्र पवार, बुवा संजय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात बुद्धपूजा पाठने झाली. त्यानंतर मान्यवर स्वागत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी कामगिरी सत्कार समारंभ तसेच विचार मंथन सभा संपन्न झाली. रात्री भीमजल्लोश स्थानिक गीत गायनपार्टी ने सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुंबई महेंद्र खांबाळेकर यांनी केले. तर प्रस्तावना रूपेश कांबळे यांनी मांडली व आभार प्रभाकर कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!