आचरा बौद्धवाडी येथे गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी….!

आचरा (प्रतिनिधी): भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म नव्याने रुजवला. विज्ञानवादाचा पाया असलेला हा धम्म सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे. बौद्ध धम्माची तत्वे लहान मुलांमध्ये रुजवली गेली तर समाज परिवर्तन झपाट्याने होईल. डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी बनून तरुण पिढीने बौद्ध धम्माचा प्रसार करावा, असे प्रतिपादन वैभववाडी तालुका बौद्ध सेवसंघाचे सचिव रवींद्र पवार यांनी केले. आचरा बौद्धवाडी येथील बौद्ध विकास मंडळ गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नूतन व्यासपीठ व सभागृहाचे सरपंच प्रणया टेमकर यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विद्याधर आचरेकर, सरपंच प्रणया टेमकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर, महिला मंडळ अध्यक्षा नंदिनी आचरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण आचरेकर, लोकमान्य बँक शाखाधिकारी राजेंद्र मोर्वेकर आदी उपस्थित होते. महिला मंडळाने बुद्धस्तवन गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर आचरेकर केले. रात्री स्थानिक महिला, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आली. यावेळी विश्वास आचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, विनोद आचरेकर, उदय आचरेकर, प्रमोद आचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, मंगेश आचरेकर, प्रसाद आचरेकर, विशाल कांबळे, तुषार आचरेकर, साहिल आचरेकर, अथर्व आचरेकर, आर्यन आचरेकर, सागर आचरेकर, राजू आचरेकर, वीर आचरेकर, आर्या आचरेकर, सानिका आचरेकर, आदिती आचरेकर, शर्वरी कांबळे, सुजल कांबळे यांच्यासह वाडीतील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांसह स्वप्नजा साटम, तुकाराम पडवळ, वसंत आचरेकर, आनंद आचरेकर, पुनाजी आचरेकर, एकनाथ आचरेकर, सुभाष आचरेकर, सिद्धार्थ आचरेकर, बाबाजी भिसळे, नंदकुमार आचरेकर यांचे मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले. लक्ष्मण आचरेकर, सरपंच टेमकर, नंदिनी आचरेकर, मोर्वेकर यांनी मनोगते व्यक्त केली. बौद्ध धम्म हा जगण्याचा मार्ग दाखवतो. तो सर्वांनी आचरणात आणला पाहिजे, असे विद्याधर आचरेकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!