उपस्थित राहण्याचे राणा समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष तुळशीदास रावराणे यांचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : महापराक्रमी शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती सोमवार दि. 22 मे रोजी सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात मराठा मंडळ सभागृह कणकवली येथे साजरी होणार आहे. महाराणा प्रताप यांची जयंती प्रतिवर्षी सिंधुदुर्गात साजरी करण्यात येते. उद्या 22 मे रोजी महाराणा प्रताप यांची जयंती आहे. शूरवीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन राणा ( महाराणा ) समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष तुळशीदास रावराणे यांनी केले आहे.