केंद्राच्या चार विद्यार्थ्यांनी पटकावले राज्य गुणवत्ता यादीत स्थान
वैभववाडी (प्रतिनिधी) : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२४ मध्ये शासकीय रेखाकला परिक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परिक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेस केंद्र क्रमांक ११५०१४ अर्जुन रावराणे विद्यालय,जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल या केंद्रावर एलिमेंटरी परिक्षेस एकुण २९४ विद्यार्थी तर इंटरमिजिएट परिक्षेस २५७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. एलिमेंटरी परिक्षेत २५६ व इंटरमिजिएट परिक्षेत २४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन केंद्राचा निकाल एलिमेंटरी परिक्षेचा निकाल ८७.०७% तर इंटरमिजिएट परिक्षेचा निकाल ९३.७७ % लागला आहे. या परिक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे एलिमेंटरी परिक्षेस १९ विद्यार्थी तर इंटरमिजिएट परिक्षेस २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १००% लागला आहे. प्रशालेचे एलिमेंटरी परिक्षेत ४ विद्यार्थी अ श्रेणीत, ७ विद्यार्थी ब श्रेणीत तर ८ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच इंटरमिजिएट परिक्षेत ८ विद्यार्थी अ श्रेणीत, ६ विद्यार्थी ब श्रेणीत तर १३ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष बाब म्हणजे यंदा या परिक्षेत केंद्र क्रमांक ११५०१४ अर्जुन रावराणे विद्यालयाची पौर्णिमा युवराज पाटील हिने शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परिक्षेत राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला तर तेराव्या क्रमांकावर सिद्धी सुरज सुतार आणि चोवीसव्या क्रमांकावर वरद मिलिंद मेस्त्री याने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले एलिमेंटरी परिक्षेत अन्सार अत्तार याने अडतीस व्या क्रमांकावर स्थान पटकावले यंदा केंद्राच्या ४ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश संपादन केले. केंद्रावर परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी मार्गदर्शन केले. परिक्षेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक बी.एस.नादकर व संस्थेचे सर्व संचालक तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.












