मुणगे (प्रतिनिधी) : मुणगे येथील कारीवणेवाडी या रस्त्यालगत असलेल्या काजूच्या बागेमध्ये काल सायंकाळी साडे सहा वाजता ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. येथील ग्रामस्थ निषाद परुळेकर, प्रतिक परुळेकर व सचिन परुळेकर हे या रस्त्याने जात असताना त्यांच्या निदर्शनास हा बछडा आला, त्यावेळी प्रतिक परुळेकर यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याचे छायाचित्र घेऊन खात्री केली असता तो दुर्मिळ ब्लॅक पँथर असल्याचे समजले. तो साधारण दोन वर्षाचा बछडा असल्याचे प्राणीमित्र यांच्याकडून समजते. मागील चार दिवसापासून हा बछडा येथील ग्रामस्थ निषाद परुळेकर व मुणगे आपईवाडी ग्रामस्थ यांच्या निदर्शनास येत असल्याचे समजते.
काजूच्या बागेमध्ये दुर्मिळ ब्लॅक पँथरचे दर्शन












