मालवणात ठाकरे सेनेला पाडले भगदाड
आचरा (प्रतिनिधी): जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद झपाट्याने वाढत असताना काल आमदार वैभव नाईक यांना मालवण तालुक्यात अजून एक जोरदार धक्का बसला आहे. शिव उद्योग आघाडी मालवण तालुका प्रमुख तसेच आमदार वैभव नाईक यांचे निकटवर्तीय मंगेश गांवकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांनसह आचरा हाँटेल डिफाँडिल्स रिसाँर्ट येथे माजी खासदार भाजप प्रदेश सरचिटणीस डाँ निलेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की मला आज अभिमान वाटला प्रवेश करणाऱ्यांनी कोणत्याही अटी, शर्थी न ठेवता प्रवेश केला, यापुढे नजर फिरेल तिकडे मालवण मध्ये प्रवेश आणि भाजप दिसून येईल. एका वर्षात जिल्ह्यात 90 कोटीची कामे मिळाली असून पालकमंत्री रविंद्र चव्हाण व नारायण राणे यांना याचे श्रेय जाते. राणे साहे़बांचा पराभव झाला हे नक्कीच पण कुडाळ-मालवण मतदार संघ 9 वर्षे मागे गेला असही मत डाँ. निलेश राणे यांनी नमूद केले. प्रवेश करणाऱ्यांचे अभिनंदन करताना डाँ. निलेश राणे म्हणाले की तुम्ही आमचा मानसन्मान राखला निलेश राणे आयुष्यभर आपला मान राखेल. जी कामे असतील मार्गी लावली जातील. निलेश राणे सदैव आपल्या पाठी असेल. यावेळी अशोक सावंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आपले विचार मांडले. प्रवेश कर्त्यांनमध्ये शिव उद्योग आघाडी मालवण तालुकाप्रमुख-मंगेश गांवकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवळे सरपंच-संतोष पानवलकर, दिपक येरम, ऋषीकेश येरम, किरण जोईल, कृष्णा साटम, वैभव वाघ, अनिल येरम, आप्पा येरम, अमर सरमळकर, अविनाश सरमळकर, प्रकाश जाधव, अनंत सरमळकर,समिर टेंबुलकर, समिर घागरे. चिंदर ग्रामपंचायत सदस्य-निलेश रेवडेकर-स्वरा पालकर-जान्हवी घाडी…अरूण घाडी, भाई तावडे, प्रमोद परब, सागर परब, प्रमोद घाडी, केशव घाडी, नंदकुमार घाडी, अनिल घाडी, दिपक घाडी, दादू घाडी, गिरीश पवार, निखिल घाडी, हर्षाली गोलतकर, भारती गोलतकर, श्रेया पालकर, वासुदेव घाडी, गणेश पाटणकर, आशिर्वाद तावडे, रमेश घाडी, सचिन जाधव, संजय घाडी, नारायण घाडी, हेंमत घाडी, गणेश पाताडे, सौरभ परब, मंदार घाडी, शेखर पालकर, शिशिर पालकर, विद्याधर पालकर, शंकर पालकर, मनिष सावंत, अनंत आचरेकर, गणेश पालकर, नित्यानंद मेस्री, राजन पालकर, आत्माराम पालकर, रविंद्र पालकर. हडी ग्रामपंचायत सदस्य-ऋषीकेश आस्वलकर, अनंत सुभेदार, तेजम शेडगे, अजिंक्य तोंडवळकर यांनी प्रवेश केला. या प्रवेशासाठी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संतोष गांवकर, संतोष कोदे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी विभागीय अध्यक्ष संतोष कोदे, प्रभारी संतोष गांवकर, बाबा परब, जेराँन फर्नांडीस, समिर बांवकर, दिपक सुर्वे, देवेंद्र हडकर, प्रकाश मेस्री, राजन गांवकर, रवि घागरे, महेश वरक, अमोल साटम, जगदिश पांगे, मनोज हडकर, उदय घाडी, सचिन हडकर,बाबू कदम, विक्रांत नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि समारोप महेश मांजरेकर यांनी केले.