संतोष देशमुखच्या हत्येस असंतोषी भ्रष्ट मतदार जबाबदार कारण, मताचा काळाबाजार हाच मृत्यूचा काळ आणणारा बाजार झाला आहे – संदीप सरवणकर

कणकवली (प्रतिनिधी) : मस्साजोग चे दिवंगत सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येला १ महिना होऊन गेला.तेव्हा फार मोठा जन आक्रोश ही झाला. त्याचे हत्येच्या गुन्ह्यात नाही पण खंडणीत, तरी ज्यांनी घरगडी, ते १० घर आणि १० गाडी ,असा कोटी कोटी उड्डाणे करणारा वाल्मिकी अण्णा, याला गृह खात्याने मोका लावला, तरी खरे कर्ता करविता अजूनही मोकाटच आहेत. आणि म्हणून प्रॉपर्टी “वाल्या” चे कार्यकर्ते सुसाट आहेत. परंतु अवादा कंपनी ला निवडणुकी खर्च म्हणून २ कोटीची वर्गणी सातपुडा बंगल्यावर बैठकीत बसवली होती आणि त्यातून हा पुढील वाद उफाळला होता. ती वर्गणी तथा खंडणी, ही राजकीय आकानी निवडून येण्यासाठी, भ्रष्ट मतदार बांधावाच्या संतोषा साठीच मागितली होती.हे एकंदरीत चित्र स्पष्ट झाले आहे. येथेच जनतेच्या अजाणते मुळे भ्रष्टाचारी धृष्टचक्र पूर्ण झालेले दिसत आहे. म्हणून असंतोषी मतदार, हेच संतोष च्या मृत्यस आणि त्याच्या अनाथ केलेल्या पोरासाठी अप्रत्यक्ष पण, मूळ जबाबदार आहेत.आता मताचा काळाबाजार हा. मृत्यू चा काळ आणणारा बाजार झाला आहे. हे जनतेच्या लक्षात आले तरी त्याला फार उशीर झाला आहे.

error: Content is protected !!