सेंट उर्सूलाचा अैनेश उदय मालंडकर प्रथम तर श्रीया देवेंद्र माळवदे द्वितीय
कणकवली (प्रतिनिधी) : शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असुन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.५४ टक्के लागला आहे.कणकवली तालुक्याचा निकाल ९८.०३ टक्के लागला आहे. कणकवली तालुक्यातील २९ पैकी १९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्यात प्रथम येण्याचा मान वरवडे येथील सेंट उर्सूला स्कुलच्या अैनेश उदय मालंडकर(९९.६०)याने मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांक सेंट उर्सूला स्कुलच्या श्रीया देवेंद्र माळवदे(९९)हिने मिळविला. तृतीय क्रमांक यज्ञेश मंगेश लाड(९८.८०) व तनया प्रवीण कदम (९८.८०,कणकवली एस.एम.हायस्कुल) तर चतुर्थ क्रमांक श्रावणी शिखरे (९८,एस.एम.हायस्कुल) व श्रीस्वरूप संतोष देसाई (९८,कणकवली विद्यामंदिर हायस्कूल) यांनी मिळविला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन 90122 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील विशेष श्रेणीत 4081 प्रथम श्रेणीत 3425, द्वितीय श्रेणीत 1296 तर उत्तीर्ण श्रेणीत187 अशा प्रकारे 8989 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची टक्केवारी 98.54 आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 97.90 टक्के लागला आहे. कणकवली तालुक्यातुन 851 विद्यार्थी व 831 विद्यार्थिनी मिळुन 1682 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील 831 विद्यार्थी व 818 विद्यार्थिनी मिळुन 1649 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 97.64 टक्के तर विद्यार्थीनिंचे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.43 टक्के असुन एकुण निकाल 98.03 टक्के आहे.
कणकवली तालुक्यातील हायस्कूल निहाय अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. कणकवली एस.एम.हायस्कुलचा निकाल ९५.९०टक्के लागला आहे. तनया प्रवीण कदम (९८.८०),श्रावणी श्रीवल्लभ शिखरे(९८),सिद्धी कुंभार(९७.६०),साहिल परब(९६.४०),यज्ञेश मोहिते(९६.२०).
कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचा ९५.४२टक्के निकाल लागला आहे. श्रीस्वरूप संतोष देसाई (९८),आयुष चेतन मालपेकर(९७.४०),साईराज श्रीकृष्ण परब(९७.२०),पारस अनिल परब(९७),शताक्षी संदीप सावंत(९६.४०). वरवडे येथील सेंट उर्सूला हायस्कुलचा ९९.०१ टक्के निकाल लागला आहे. आय
नेश उदय मालंडकर(९९.६०),श्रिया देवेंद्र माळवदे(९९),यज्ञेश मंगेश लाड(९८.८०). कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा१०० टक्के निकाल लागला आहे. ऋतुजा बंडवे(९०.६०),अथर्व भोगटे(९०.२०),रीना सावंत(८९). शेठ म.वि. केसरकर हायस्कूल, वारगाव चा निकाल परंपरेप्रमाणे १०० टक्के लागला. आदित्य जाधव (८९.४०), पृथ्वीराज नामये( ८६),सिद्धी टक्के(८५.६०). आदर्श विद्यालय करंजेची १००टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. सानिका आर्डेकर ( ९४.८०), दिव्या कोरगावकर ( ८९) , माधुरी मेस्त्री( ८७. ८० ). शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय,खारेपाटणचा निकाल १०० टक्के लागला आहे. सावली हरयाण(९५.४०),संचिता केंगाळे(९५.४०),अर्पिता पाटील(९३.२०),हसरी म्हाडेश्वर(९२.६०)सोहम कोलते(९२.६०). न्यू इंग्लिश स्कुल फोंडाघाटचा निकाल ९८.४२टक्के लागला आहे.पारस आचरेकर(९७),जान्हवी पवार(९६.४०),सर्वेश आडीवरेकर(९४.६०). सावडाव हायस्कुलचा निकाल १००टक्के लागला आहे.तन्मय खांदारे(७४.४०),गणपत आचरेकर(७१.६०),साक्षी कुबल(७०.६०). सरस्वती हायस्कूल नांदगावचा निकाल ९८.४८ टक्के लागला आहे. भक्ती हडकर (९१), अशफाक साटविलकर( ८९.२०) धनंजय म्हसकर(८८.८० ). कळसुली इंग्लिश स्कुलचा निकाल ९८.२७ टक्के लागला आहे.श्रिया मठकर(९४.४०),सुमन गुरव(९४.२०),साक्षी गावडे(९१.६०). नरडवे हायस्कुलचा निकाल १००टक्के लागला आहे. विठ्ठल अडूळकर(९४.२०),वैदेही कांदळकर(८९.४०),समृद्धी राणे(८८),कुणाल कदम(८८). कुंभवडे हायस्कुलने १०० टक्के निकालाची परंपरा जपली आहे.श्रेयस प्रभुदेसाई(८४.४०),सृष्टी गोसावी(८३.४०),श्रावणी घाडी(८२.६०).शेर्पे हायस्कुलच्या साक्षी शेलार हिला(८१.८०),मानसी कुडाळकर(८०.४०),साक्षी कुडाळकर(८०.२०),श्रुतिका गोसावी(८०.२०).हरकुळ बुद्रुक येथील ए. के.एम. हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. हम्माद बडेघर(९३.२०),सिफवत सोलकर(८४.६०),नजराणा नाईक(८२.४०). हरकुळ खुर्द विद्यामंदिर हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. हर्ष कदम(९४.४०),जयश्री तेली(९३.२०),रोशन बाणे(९०.२०). माध्यमिक विद्यालय नाटळचा निकाल १०० टक्के लागला असुन ४९ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम सानिका प्रदीप नेवाळकर (९३ ), द्वितीय नमिता रमेश सावंत (९२.२० ),=तॄतीय विरानी विलास मराठे (८९.४० ) यांनी यश प्राप्त केले आहे.