पणदूर हायस्कुलचा कृष्णकांत अटकेकर कुडाळ तालुक्यात प्रथम
कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल यावर्षी ९७.७० टक्के लागला असून पणदूर हायस्कुलचा कृष्णकांत अटकेकर (९८.८० टक्के) गुणांसह तालुक्यात प्रथम आला आहे. तर द्वितीय क्रमांक कुडाळ हायस्कुलची राधिका तेरसे (९८.२० टक्के) आणि वरद माईनकर (९८.२० टक्के), तृतीय क्रमांक पाट हायस्कुलचा आदित्य नाईक (९७.८० टक्के) यांनी मिळविला.कुडाळ तालुक्यातून १ हजार ७४५ पैकी १ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तालुक्यातील २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून ७८४ विद्यार्थी विशेष श्रेणी, ६२४ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर २४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झालेत.
कुडाळ हायस्कूल कुडाळचा निकाल ९६.२४ टक्के
कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीतील २१३ पैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल (९६.२४ टक्के) लागला. या परीक्षेत प्रथम क्रमांक राधिका तेरसे (९८.२० टक्के) आणि वरद माईनकर (९८.२० टक्के), द्वितीय क्र. अन्वय पाटकर (९७ टक्के). तृतीय युतिका पालव (९६.८० टक्के ) यांनी मिळविला. या प्रशालेचे ९० टक्केच्या वरील २३ विद्यार्थी असून संस्कृत विषयांमध्ये १०० पैकी १०० मिळवणारे ७ विद्यार्थी आहेत.
पणदूर हायस्कूलचा निकाल १०० टक्के निकाल
शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा या प्रशालेतून १५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व १५६ उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल १०० लागला. शाळेत प्रथम क्रमांक कृष्णकांत अटकेकर (९८.८० टक्के), व्दितीय पियुषा सावंत (९७ टक्के), तृतीय सेजल सुर्वे (९५ टक्के) असे गुण मिळविले.
तालुक्यातील इतर निकाल :
कुडाळ तालुक्यातील सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ २२ पैकी २० विद्यार्थी पास झाले. शाळेचा निकाल (९५.२३ टक्के) लागला. प्रथम क्रमांक कु. नेत्रा मुंडले (८६.८० टक्के), कु. विवेक टेमकर (८६.८० टक्के), द्वितीय- साक्षी आसोलकर (८६ टक्के), तृतीय मिथुन हळदणकर (८५.४० टक्के).
शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के प्रथम कु .श्रावणी नारकर (९३.८०), द्वितीय कु. राखी राजेंद्र देसाई (९१.८० टक्के), तृतीय कु. शिवानी महादेव गुरव (८८.२० टक्के), कु . केतन अंकुश कदम (८८.२० टक्के).
आवळेगाव हायस्कूल आवळेगाव
आवळेगाव हायस्कूलचा निकाल १०० टक्के निकाल लागला असून प्रथम – सोनाली धुमाळे (९२.२० टक्के), द्वितिय धनश्री राजेंद्र कुपेरकर (९१.२० टक्के), तृतीय – हेतल मेस्त्री (८६.६० टक्के).
भडगाव हायस्कूलचा १०० टक्के निकाल लागला. या परीक्षेत एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. विद्यालयात प्रथम क्रमांक कु. खुशी सावंत (९३ टक्के) . द्वितीय क्रमांक कु. अनुष्का नाईक (९१.८० टक्के) व तृतीय क्रमांक कु. अक्षता सावंत (९१.२० टक्के) यांनी मिळविला.
डिगस माध्यमिक विद्यालय डिगस हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला. या परिक्षेत प्रथम कु. रेशम सावंत (९४.२० टक्के), द्वितीय क्र. हरिशा पवार ( ९३.२० टक्के), तृतीय क्र. दिक्षा परब ( ९२.८० टक्के).
कलेश्वर विद्यामंदिर नेरूर या हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला. या परिक्षेत प्रथम शुभांगी नेवगी ( ९०.४० टक्के), द्वितीय क्र. जयेश मार्गी (७८.६० टक्के), तृतीय क्र. प्रिया नेरूरकर ( ७५.४० टक्के).
शिवाजी हायस्कुल व ज्युनि.कॉलेज ऑफ कॉमर्स् व सायन्स जांभवडे
हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला. या परिक्षेत प्रथम क्र. कु. दीक्षा गोवेकर ( ९५ टक्के), द्वितीय क्र. कोमल सावंत ( ९१ टक्के), तृतीय क्र. अश्विनी काजरेकर ( ८९.४० टक्के).
बिबवणे हायस्कूल
बिबवने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.४१ टक्के लागला. २८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. प्रथम क्र. तन्वी लुडबे (९७ टक्के) ,द्वितीय क्र. समृद्धी पिंगुळकर (८७.८० टक्के), तृतीय क्र. पारस संतोष गावडे (८३ टक्के) यांनी यश मिळविले.
एस. एल. देसाई विद्यालय पाट हायस्कुलचा निकाल ९६.४२ टक्के लागला. या परिक्षेत प्रथम क्र. आदित्य नाईक ( ९७.८० टक्के), द्वितीय क्र. समिक्षा तेजम ( ९६.४० टक्के), तृतीय क्र. पार्थ गोसावी ( ९६ टक्के).
हळदीचे नेरूर हायस्कुलचा १०० टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम क्र. श्रद्धा राऊळ (९५.२० टक्के), नारायण सावंत (९४ टक्के), विघ्नेश खंदारे ( ९२.२० टक्के).
डॉन बॉस्को हायस्कुल
या शाळेचा निकाल १०० टक्के लागला. प्रथम क्र. शर्विल बागवे (९७ टक्के),द्वितीय क्र. सानिका सावंत (९६ टक्के), तृतीय क्र. सोहम लाड (९५.६० टक्के).
शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव
साळगाव येथील
शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.२३ लागला. यामध्ये प्रथम क्र. मधुकर तेंडोलकर( ९३.२० टक्के), द्वितीय क्र. श्रेया तामाणेकर (९०.८० टक्के). तृतीय क्र. रुचिरा चव्हाण ( ८९.२० टक्के).
माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम प्रथम क्रमांक प्रणया केरकर ( ९४ टक्के), द्वितीय क्रमांक मिताली गावडे ( ९०.८० टक्के),तृतीय क्र. नुतन परब ( ८१ टक्के) लागला.