आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बांदा गडगेवाडीतील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग

पटेल बंधूंचे मोठे आर्थिक नुकसान बांदा (प्रतिनिधी) : बांदा शहरातील दोडामार्ग रस्त्यावरील गडगेवाडी येथे असलेल्या कल्पना ट्रेडर्स या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून पटेल बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती…

उपसभापती सोनू सावंत यांचा लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने सत्कार

उपसभापतीपदातून वरवडे गावविकासाला प्राधान्य – सोनू सावंत कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या उपसभापती निवडीनंतर माझ्या वरवडे गावात श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या वतीने माझा झालेला सत्कार भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे. पंचायत समिती सदस्यपदी माझी बिनविरोध निवड झाली त्यामागे माझ्या गावाचा…

शिरशिंगे–शिवापूर घाटमाथा रस्त्यासाठी महत्त्वाची पावले

जमिनीची वर्गवारी पूर्ण, रस्त्याचा मार्ग मोकळा कुडाळ (प्रतिनिधी) : सावंतवाडी–कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा घाटमाथ्यावरील कलंबिस्त–शिरशिंगे–शिवापूर मार्गाचा रस्ता लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी संदर्भातील प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली.…

आंबा-काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा दिलासा; नियमित कर्जफेडीवर २ टक्के अतिरिक्त व्याज सवलत

ओरोस (प्रतिनिधी) : बँकेकडून आंबा, काजू या नगदी पिकांसाठी ११० कोटी एवढे शेती कर्ज बँकेमार्फत वितरित केले जाते. शेतकऱ्यांचे हित जाणून जिल्हा बँकेने चालू वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा, काजू पीक शेतकरी कर्जदारांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने चालू पीक हंगामामध्ये…

जागतिक महिला दिनानिमित्त नेरूर करमळगाळव येथे पाककला स्पर्धा व विद्यार्थ्यांना सौर लॅम्प वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त खा. प. शाळा नेरूर करमळगाळव आणि अंगणवाडी करमळगाळव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पालकर, सडवेलकर, चौधरी, गावडे, शिरसाट, बाईत, गावडे,…

वेंगुर्लेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त लक्ष्मी मांजरेकर यांचा सत्कार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : बदलत्या आधुनिक काळातही गावठी औषधांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणाऱ्या वेंगुर्ला येथील लक्ष्मी पांडुरंग मांजरेकर यांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आधुनिक आरोग्य व्यवस्थेत मोठे बदल झाले असले तरी काही…

खारेपाटण ग्रामपंचायतीचा पंचायत राज अभियानात सक्रीय सहभाग

गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ गाव निर्मल गाव व हरित गाव करण्याचा संकल्प खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६” मध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतला. या अभियानाच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ…

खेळातून निरोगी आयुष्याचा लाभ – तृप्ती धोडमिसे

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित क्रिक्रेट स्पर्धेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुखर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा असतो. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळते. त्यामुळे नियमित खेळणे महत्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या…

फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश धाक्रस यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट हवेलीनगर येथील इंजिनिअर मयुरेश दिलीप धाक्रस (वय ३७) यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण करुळ हायस्कूल येथे झाले असून पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरी आणि पुणे येथे…

बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा : जिल्हाध्यक्ष अमित सामंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पात तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी आर्थिक नुकसान भरपाईची भरघोस तरतूद राज्य सरकारने केली नाहीच. याचा स्पष्ट अर्थ तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना आर्थिक खाईत लोटण्याचाच निंदाजनक प्रकार राज्य सरकारचा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तळकोकणातील…

error: Content is protected !!