कुडाळ (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त खा. प. शाळा नेरूर करमळगाळव आणि अंगणवाडी करमळगाळव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पालकर, सडवेलकर, चौधरी, गावडे, शिरसाट, बाईत, गावडे, दांडेकर या पालकांनी उत्साहाने सहभाग घेत विविध चविष्ट पदार्थ सादर केले. उपस्थितांनी स्पर्धेचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना सौर लॅम्पचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राणे, सदस्य सुनील दांडेकर, दीपक गावडे, रवी वारंग, श्रीमती राणे, शाळेचे मुख्याध्यापक सचिन तुळसुलकर व उपशिक्षक अमोल तांबे उपस्थित होते. तसेच इतर मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.












