आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग पोलिसांचा ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद उपक्रम

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीसांनी एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळी सण निमित्त संवाद साधत आधार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जिल्हाभरात २२ ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मेळावे घेत ८०१ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच तसेच १५० ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन…

मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.या भेटीत दोघांमध्ये विविध प्रशासकीय आणि विकासकामांबाबतही चर्चा झाली.तसेच पालकमंत्री नितेश…

खारेपाटण मध्ये नरकासुरचे दहन करून दीपोत्सव साजरा

खारेपाटण मधील के. सी. सी. मित्र मंडळ व कपिलेश्वर प्रासादिक मंडळाचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पूर्व संध्येला खारेपाटण मधील के. सी. सी. मित्र मंडळ कोष्ट्येवाडी खारेपाटण व श्री देव कपिलेश्वर प्रासादिक मंडळ खारेपाटण या सामजिक मंडळांच्या वतीने रविवारी रात्री…

नवतरुण मित्रमंडळ आचरा नरकासुर स्पर्धेत विश्वकर्मा मेस्त्रीवाडी प्रथम

आचरा (प्रतिनिधी) : नवतरुण मित्रमंडळ आचरा तर्फे आयोजित नरकासुर स्पर्धेत विश्वकर्मा मेस्त्रीवाडी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक घाडीवाडी मित्रमंडळ, तृतीय क्रमांक डोंगरेवाडी संघांने मिळविला. स्पर्धेचे बक्षिस वितरण उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आचरा गावचे उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात…

फोंडाघाट मध्ये नरकासुराची धिंड काढून दीपोत्सव साजरा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने, दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला नरकासुराची धिंड काढण्यात आली आणि पहाटे दहन केले. असुरक्षितते कडून सुरक्षितते कडे! अंधारातून प्रकाशा कडे! अधर्मातून धर्माकडे! दानवत्वा कडून देवत्वा कडे! अन् असत्यावर सत्याचा प्रवास जल्लोषात साजरा करण्यात आला.

नानिक इंग्लिश हायस्कूल कोपरी ठाणे येथील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण

खारेपाटण (प्रतिनिधी) : विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ ठाणे यांच्या वतीने नानिक इंग्लिश हायस्कूल कोपरी ठाणे या शाळेतील सहावी, सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना नुकतेच दिवाळीचे कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शामसुंदर धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुंदर व आकर्षक दिवाळी कंदिल बनविण्याचे…

प्रकाश कांबळे यांना राष्ट्रपिता म. गांधी समाजभूषण पुरस्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगवे गावचे सुपुत्र प्रकाश मनोहर कांबळे यांना नुकताच राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स समिती ठाणे या संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता म. गांधी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या पुरस्कार…

ज्ञानदिप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशालेत दिवाळी उत्साहात साजरी….!

आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदिप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशालेत दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी कंदील बनवणे तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देणारी ग्रिटिंग्स कार्ड बनवली, सभागृह अप्रतिम रांगोळी रेखाटली होती. दिवे प्रज्वलित करुण दिवाळी च्यापूर्वसंध्येला शुभेच्छा देण्यात आल्या. ज्ञानदीप संस्था…

‘सक्षम बेटी सक्षम समाज’ उपक्रमांतर्गत चेंदवण शाळेतील २० मुलींना सायकल वाटप

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा सायकल प्रोजेक्ट : ग्रामीण मुलींच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य कुडाळ (प्रतिनिधी) : चेंदवण सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य हेच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सायकल प्रोजेक्टचे यश असल्याचे प्रतिपादन चेंदवणच्या माजी विद्यार्थीनी तथा माजी उपसरपंच रश्मी…

खारेपाटण येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पथदीप बंद

ऐन दिवाळीत खारेपाटण मध्ये मात्र अंधार महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीच्या सणात सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळला जात असतानाच खारेपाटण येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बॉक्सवेल ब्रीज तसेच मार्गावरील मुख्य पथदीप गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत…

error: Content is protected !!