आचरा (प्रतिनिधी) : ज्ञानदिप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशालेत दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी कंदील बनवणे तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देणारी ग्रिटिंग्स कार्ड बनवली, सभागृह अप्रतिम रांगोळी रेखाटली होती. दिवे प्रज्वलित करुण दिवाळी च्यापूर्वसंध्येला शुभेच्छा देण्यात आल्या.
ज्ञानदीप संस्था वायंगणी संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी स्व खर्चातून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वृंद यांना दिवाळीच्या निमित्ताने खाऊ वाटप केले. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंत प्रभू, अँड समृद्धी असोलकर, मुख्याध्यापन डी.जे टकले, सर्पमित्र स्वप्नील गोसावी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्टीत वाचन व पाठांतर यावर भर द्यावा असे आवाहन शिक्षिका प्रभा बांवकर यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्या प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. उत्साहपूर्ण कार्यक्रम शाळेत सतत करत राहिले पाहीजेत अशी अपेक्षा ॲड. समृद्धी असोलकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जाधव सर यांनी केले.










