खारेपाटण मध्ये नरकासुरचे दहन करून दीपोत्सव साजरा

खारेपाटण मधील के. सी. सी. मित्र मंडळ व कपिलेश्वर प्रासादिक मंडळाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पूर्व संध्येला खारेपाटण मधील के. सी. सी. मित्र मंडळ कोष्ट्येवाडी खारेपाटण व श्री देव कपिलेश्वर प्रासादिक मंडळ खारेपाटण या सामजिक मंडळांच्या वतीने रविवारी रात्री १२ वाजता एस. टी. स्टँड खारेपाटण येथील भर चौकात नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी खारेपाटण मधील ज्येष्ठ नागरिक महिला-पुरुष व युवक-युवती लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरकासूर राक्षसाच्या प्रतिमेच्या मोठ्या अक्राळ-विक्राळ प्रतिमा तरुण मुलांनी बनवलेल्या होत्या या प्रतिमांची वाजवत धिंड काढत खारेपाटण बाजारपेठेतून खारेपाटण एस. टी. बस स्थानक येथे आणून या प्रतिमांचे सामूहिक दहन करून आनंदी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जोरदार फटाक्यांची आतीशबाजी करण्यात आली.

error: Content is protected !!