प्रकाश कांबळे यांना राष्ट्रपिता म. गांधी समाजभूषण पुरस्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगवे गावचे सुपुत्र प्रकाश मनोहर कांबळे यांना नुकताच राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स समिती ठाणे या संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता म. गांधी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या पुरस्कार निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

प्रकाश मनोहर कांबळे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिसरात परिचयाचे असून भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय धार्मिक संघटनेचे ते पदाधिकारी आहेत. ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स समिती ठाणे आणि करडे स्पोर्ट्स अकॅडमी रायगड आयोजित कार्यक्रमात मराठी ग्रंथ संग्रहालय रेगे सभागृह ठाणे येथे सुप्रसिद्ध गायक व बिग बॉस कलाकार संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व ग्लोबल सोशल एक्सलंट कॉन्फरन्स समिती ठाणे आणि करडे स्पोर्ट्स अकॅडमी रायगड चे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!