नानिक इंग्लिश हायस्कूल कोपरी ठाणे येथील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण

खारेपाटण (प्रतिनिधी) : विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ ठाणे यांच्या वतीने नानिक इंग्लिश हायस्कूल कोपरी ठाणे या शाळेतील सहावी, सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना नुकतेच दिवाळीचे कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शामसुंदर धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुंदर व आकर्षक दिवाळी कंदिल बनविण्याचे प्रशिक्षण संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी डाॅ. शिल्पा सक्सेना, अरूणा जगियासी, उमेश सक्सेना, सतिश ठाणगे, सचिन घाग यांनी मिळून आर्थिक योगदान दिले. तर नानिक हायस्कूलच्या प्राचार्य पद्मजा कुलकर्णी यांनी चांगले सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर आकाश कंदिल तयार केले व समारोप प्रसंगी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व उपस्थितांना बिस्किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात ज्योती जादवानी, माधवी लेले, पांडुरंग शिर्के, शशिकांत कोळेकर हे विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटनेचे सभासद उपस्थित होते.

error: Content is protected !!