आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ शहरात भरदिवसा धाडसी चोरी; निवासी संकुलातील पाच फ्लॅट फोडले

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गालगत राज हॉटेल नजिक असलेल्या कुडाळ शहरातील एका निवासी संकुलातील चार ते पाच फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.…

महिला प्रवासीचा विनयभंग; मालवणातील युवकाला दीड वर्षांची शिक्षा

ओरोस (प्रतिनिधी) : एसटी मध्ये चढत असल्याचा फायदा घेऊन महिला प्रवासीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मालवण तालुक्यातील मालोंड मलावाडी येथील किशोर दिगंबर मालोंडकर वय – ३९ वर्षे यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांना एक वर्षे सहा महिने सश्रम कारावास व…

खारेपाटणमधील अवकाळीग्रस्तांना मोफत कौले वाटप

सतीश गुरव यांची सामाजिक बांधिलकी कणकवली (प्रतिनिधी) : अलीकडेच झालेल्या वादळी अवकाळी पावसात नुकसानग्रस्त झालेल्या खारेपाटणवासीयांना सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी मदतीचा हात देत मोफत कौंले वाटप केले आहे. मागील चार दिवसांत वादळी अवकाळी पावसाने खारेपाटण गावाला अक्षरशः झोडपून काढले…

तिथवलीचे सुपुत्र आणि मुंबईचे नवनिर्वाचित नगरसेवक किरण तावडे यांचा मूळ गावी जंगी सत्कार!

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लालबाग-परळ (वॉर्ड क्र. २०४) येथील नवनिर्वाचित नगरसेवक आणि तिथवलीचे सुपुत्र किरण तावडे यांचा त्यांच्या मूळ गावी नुकताच ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. नगरसेवकपदी शानदार विजय मिळवल्याबद्दल तिथवली ग्रामपंचायत कार्यालयात हा आनंदोत्सव…

सीईओं ना दमदाटी पडली महागात ; 2 वर्षांची सश्रम जेल आणि दंड

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : शासकीय कामात अडथळा आणून नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी करणे वेंगुर्ले शहरातील म्हाडा कॉलनीतील आरोपी मच्छिन्द्रनाथ प्रताप मोरे याला चांगलेच महागात पडले असून या गुन्ह्यात जिल्हा न्यायाधीश श्री. इंदलकर यांनी…

जिल्हा रुग्णालयाला भ्रष्टाचाराची कीड ; मेडिकल बिल मंजूरीसाठी लाच घेताना अधीक्षक अटकेत

बिलाच्या 3 टक्के रक्कमेचा रेट ; अधीक्षक महादेव तेलीवर एसीबी ची रेड ओरोस (प्रतिनिधी) : येथील जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली ) यांनी एका व्यक्तीचे वैद्यकीय उपचार बिल मंजूर करण्यासाठी लाचेची…

कै श्रीकांत सांबारी स्मृती दिना निमित्त आचरा येथे ‘नाट्योत्सव २०२६’ कार्यक्रम संपन्न

श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा व मंदार सांबारी कुटुंबीय, आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा व मंदार सांबारी कुटुंबीय, आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता…

चिंदर सडेवाडी ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे सोमवार ११ मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ब्राह्मण देवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी ब्राह्मण देव सेवा मंडळ…

फोंडाघाट येथील जुने जाणते व्यक्तिमत्व आबा हळदिवे यांचे निधन ! ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास—

​फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावातील जुन्या पिढीतील एक प्रतिष्ठित आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आबा कृष्णा हळदिवे (वय ९१) यांचे दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. ओरस येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना…

जिल्ह्यातील बारा कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे परवाने रद्द तर पाच परवाने निलंबित

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात निविष्ठा विक्री केंद्रांच्या तपासणी मोहिमेमध्ये एकूण १९ कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्या. अनियमितता आढळलेल्या १९…

error: Content is protected !!