काळसेत कृषि विभाग, महसूल विभाग आणि प्रगत शेतकरी गट, महापुरुष शेतकरी गटाचा स्तुत्य उपक्रम
चौके (प्रतिनिधी) : संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील काळसे गावातही मोठया प्रमाणावर वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सर्वप्रथम माळकेवाडी बामणदेव येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वनराई बंधारा बांधून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर तालुका कृषि विभाग, ग्रामपंचायत, काळसे ग्रामस्थ, गावातील प्रगत शेतकरी गट, महापुरुष शेतकरी गट यांनी विशेष पुढाकार घेऊन बामणदेव ते मळा पोई बंधारा या दरम्यानच्या परिसरात एकाच नाल्यावर ठीकठिकाणी तब्बल १४ वनराई बंधारे बांधून जल संधारणात मोठा हातभार लावला आहे.
या दरम्यान शनिवार ९ ऑक्टोबर रोजी उपविभागीय कृषि अधिकारी उमाकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा कृषि कर्मचारी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गच्या पदाधिकारी यांनीही काळसे येथे उपस्थित राहून श्रमदान केले व नाल्यातील गाळ काढून वनराई बंधारा बांधला. यावेळी पतसंस्था चेअरमन राजन सावंत, उपाध्यक्ष अनंत बोडेकर संचालक संचिता फाळके, धनंजय गावडे, सदस्य बापू सावंत, कृषि सहाय्यक स्नेहा खोत, प्रगत शेतकरी बचत गट काळसेचे अध्यक्ष मनोज मालवणकर, श्याम मालवणकर, सुनिल मालवणकर, संजय गोसावी, ज्ञानेश्वर सातार्डेकर, लिलाधर नाईक, मंदार मयेकर, सतीश जुवेकर, मंगेश पात्रे, अजिंक्य मालवणकर, दिनेश ठाकूर, सुधीर नाईक, शाहू वरक, ग्रामपंचायत सदस्य ख़ुशी राऊळ, सीमा मालवणकर, हर्षदा मालवणकर, मधुसूदन साळसकर, श्री. महापुरुष शेतकरी गट काळसे बागवाडाचे अध्यक्ष सतीश माडये, ललित कोरगावकर, द्वारकानाथ पावसकर, अनिल पावसकर, सुनिल पावसकर, प्रमोद माडये, संतोष कोरगावकर, पंकज कोरगावकर, अनिल हेरेकर तसेच श्री स्वामी समर्थ शेतकरी गट पेंडूरचे अध्यक्ष प्रसाद मेस्त्री, स्वप्निल मेस्त्री, सुंदर मेस्त्री, रघुनाथ मेस्त्री, विश्राम सावंत, कल्पेश मेस्त्री आणि काळसे बागवाडा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण आकेरकर शिक्षिका स्वाती बोडखे, अंगणवाडी सेविका धनश्री धुरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती माडये या सर्वांनी उपस्थित राहून श्रमदान केले आणि वनराई बंधारा बांधण्यास हातभार लावला. काळसे गावातील सर्व वनराई बंधारे बांधण्यासाठी उपतालुका कृषि अधिकारी धनंजय गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. या कामी त्यांना प्रगत शेतकरी गट, महापुरुष शेतकरी गट यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या या जसंधारण कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.












