आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गोवा ते भाऊ धक्का प्रवासी जलवाहतूक बोट सुरू करा

माजी वित्त बांधकाम सभापती संजय बाेंबडी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी देवगड (प्रतिनिधी) : पूर्वी गोवा ते भाऊचा धक्का अशी प्रवासी बोट चालू होती. तेव्हा देवगड, विजयदुर्ग, मुसाकाजी, जयगड अशी बंदरे प्रवाशांसाठी जाण्या येण्यासाठी सुरु होती. तशाच पध्दतीने प्रवासी बोट चालू झाल्यास…

सख्ख्या भावाला बांबू च्या दांड्याने मारहाण ; गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : सख्ख्या भावाला बांबूच्या दांड्याने मारहाण केल्याबद्दल रिचर्ड इत्रु फर्नांडिस ( वय ३०, रा. सांगवे, घोसाळवाडी) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात बी एन एस ११८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जॉन्सन इत्रु फर्नांडिस याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रिचर्ड…

देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड…

३९ वर्षांनी इनामदार देव रामेश्वर व “श्री कुणकेश्वर यांची झाली ऐतिहासिक भेट

आचरा देवस्थान व कुणकेश्वर देवस्थानचे चोख नियोजन आचरा (प्रतिनिधी) : संस्थानकालीन आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर तरंगाच्यास्वारीसह छञ चामरे, अब्दागिर, निशाण, महालदार, चोपदार, मानकरी यांच्यासह हजारो भाविकांच्या साक्षीने संस्थानी आब राखत आचऱ्याचा राजाची तब्ब्ल ३९ वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर’…

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मा. आम. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ…

कणकवलीत 8 मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुतारवाडी येथील विश्वकर्मा मित्रमंडळातर्फे शनिवार 8 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता श्री देव स्वयंभू मंदिर मार्गावरील निमेवाडी येथील मैदानावर भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10…

प्रतीक कोतवाल यांना भारत बिजनेस अचीवर अवॉर्ड्स 2025 प्रदान

अभिनेत्री अमृता राव, सीईओ साबे यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील इंजिनिअर प्रतीक खंडेराव कोतवाल यांना स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया प्राईम टायकून मीडिया व टेक एलएलपी यांच्या वतीने बेस्ट कस्टमर सर्व्हिस अवॉर्ड इन मल्टी सर्व्हिसेस पुरस्कार…

बेलाच्या पानावरती साकारले एक इंचाचे महादेवाचे सुंदर चित्र

गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची कलाकृती आचरा (प्रतिनिधी) : असं म्हणतात की महादेवाला बेलाचे पान वाहिले जाते आणि त्याचं बेलाच्या पानावरती देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने महाशिवरात्री निमित्त एक इंचाची महादेवाची सुबक कलाकृती साकारली…

आंगणेवाडी येथे 27 फेब्रुवारी रोजी “कुणीतरी आहे तिथं ” नाट्यप्रयोग !

मसूरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई- आंगणेवाडी यांच्या हिरक महोत्सवी वर्षा निमित्त श्री देवी भराडी रंगमंच आंगणेवाडी येथे “कुणीतरी आहे तिथं “ हे नाटक 27 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता सादर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक महेश सावंत, नेपथ्य…

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा वेंगुर्लाच्या अध्यक्ष पदी झिलू गोसावी यांची निवड.

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा वेंगुर्लाच्या विद्यमान कार्यकारीणीची मुदत संपल्यानंतर नवीन कार्यकारीणी निवडण्यासाठी ३० जानेवारी रोजी विठ्ठलमंदिर भुजनाकवाडी, वेंगुर्ला येथे यशवंत गोविंद मठकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली व सर्वांनुमते नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली.…

error: Content is protected !!