गोवा ते भाऊ धक्का प्रवासी जलवाहतूक बोट सुरू करा

माजी वित्त बांधकाम सभापती संजय बाेंबडी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

देवगड (प्रतिनिधी) : पूर्वी गोवा ते भाऊचा धक्का अशी प्रवासी बोट चालू होती. तेव्हा देवगड, विजयदुर्ग, मुसाकाजी, जयगड अशी बंदरे प्रवाशांसाठी जाण्या येण्यासाठी सुरु होती. तशाच पध्दतीने प्रवासी बोट चालू झाल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यातील व प्रत्येक बंदरातील लोकाना आर्थिक फायदा होईल व वरील बंदरे विकसित होतील. तसेच समुद्रकिनारी रहाणाऱ्या लोकांची समस्या दूर होईल.तरी आपण लक्ष घालून प्रवासी बोट चालू करावी व जनतेची मोठी समस्या दूर करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे माजी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम समिती सभापती संजय बाेंबडी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व मस्त्याेद्याेग मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!